Homeगडचिरोलीआजादमध्ये पक्ष प्रवेशाची लाट ; ASP ने भाजप- काँग्रेस वर साधला...

आजादमध्ये पक्ष प्रवेशाची लाट ; ASP ने भाजप- काँग्रेस वर साधला निशाणा.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीत आजाद समाज पार्टीचा वाढता प्रभाव

गडचिरोली जिल्ह्यामध्ये जनतेचा कल आता आझाद समाज पार्टी कडे.

गडचिरोली : काँग्रेस – भाजप नंतर आता आजाद समाज पार्टीकडे उमेदवारांचा झुकाव दिसून येत असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजादचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसत आहे.

गडचिरोली येथे आजाद समाज पार्टीची निवडणूकपूर्व तयारी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश सचिव तथा निवडणूक निरीक्षक धर्मानंद मेश्राम, प्रभारी विनोद मडावी, हंसराज उराडे, व महासचिव उपस्थित होते. जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

बैठकीत बोलताना धर्मानंद मेश्राम म्हणाले,

> “आगामी निवडणुकीत आजाद समाज पार्टी सुशिक्षित युवकांना प्राधान्य देणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, निराधार, कामगार व शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित लढा आम्ही उभारणार आहोत.”

जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले की,

> “पक्षाचे प्रमुख नेते स्वतः मैदानात उतरणार असून जिल्ह्यातील सुमारे ३५ जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. योग्य वेळी त्यांची नावे जाहीर केली जातील.”

बैठकीदरम्यान मोठ्या संख्येने युवकांनी आजाद समाज पार्टीत प्रवेश केला.
🔹 भामरागड तालुकाध्यक्ष पदी – महेंद्र उसेंडी
🔹 चामोर्शी युवा आघाडी तालुकाध्यक्ष पदी – छोटभाई खोब्रागडे
🔹 तालुका महिला सदस्य पदी – रजनी डांगरे
🔹 युवा उपाध्यक्ष पदी – रोशन दुर्गे
अशा विविध नियुक्त्यांची घोषणाही यावेळी करण्यात आली.

राज बन्सोड यांनी पुढे सांगितले की,

> “गडचिरोली नगर परिषदेत नगर विकास आघाडीच्या माध्यमातून आजाद समाज पार्टी ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने काँग्रेस आणि भाजपने दलित, आदिवासी, मुस्लिम आणि माळी समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. भाजपकडून अपेक्षा नव्हतीच, पण काँग्रेसने स्वतःच्या पक्षातील दिग्गज उमेदवारांना डावलून राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करून कार्यकर्त्यांवर थोपवला — त्यामुळे पक्षात मोठी नाराजी असून याचा फायदा तिसऱ्या आघाडीला मिळू शकतो.”

त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले —

> “दलित-आदिवासींच्या खांद्यावर उभे राहून सत्तेचा आनंद लुटणाऱ्या काँग्रेस-भाजपने निवडणुकीत मात्र त्यांनाच डावलले आहे. यावेळी समाज जागा आहे, आणि तिसऱ्या पर्यायाच्या रूपात नगर विकास आघाडी मजबुतीने उभी आहे.”

बैठकीच्या शेवटी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनाशी लभाने (डांगे) यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटनही मोठ्या उत्साहात करण्यात आले.
त्या गडचिरोली नगर परिषदेत प्रभाग क्र. ५ मधून उमेदवारी दाखल करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

🔷 गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आजाद समाज पार्टीचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. काँग्रेस-भाजप नंतर आता मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू — ‘आजाद समाज पार्टी’ ठरली आहे.

जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाशी लभाने, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम रामटेके, विधानसभा प्रभारी धनराज दामले, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषी भाऊ सहारे, टारझन निमगडे, जिल्हा सचिव प्रकाश बनसोड, जिल्हा उपाध्यक्ष कुशाल उपाध्यक्ष खुशाल मरसकोल्हे, गडचिरोली तालुका अध्यक्ष प्रेम मडावी, आरमोरी तालुकाध्यक्ष एडवोकेट नर्गिस पठाण, तालुका सचिव सुरेंद्र वासनिक, कुरखेडा तालुका अध्यक्ष सावंत चीकराम, तालुका सचिव लोकेश लाडे, गडचिरोली युवा तालुकाध्यक्ष नितेश वेसकडे, आरमोरी युवा अध्यक्ष लकी पाटील, उपाध्यक्ष पियुष वाकडे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments