Homeगडचिरोलीचामोर्शी–हरणघाट मार्ग जैसे थे; अनेक निवेदनं, आंदोलनं व्यर्थ — सार्वजनिक बांधकाम विभाग...

चामोर्शी–हरणघाट मार्ग जैसे थे; अनेक निवेदनं, आंदोलनं व्यर्थ — सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी :

चामोर्शी ते हरणघाट हा मुख्य मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे. नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी अनेक वेळा निवेदनं देऊन, आंदोलनं करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.

दररोज या मार्गावरून शेकडो नागरिकांचा प्रवास होत असतो. रस्त्यावरील खड्डे, तुटलेले भाग आणि पाण्याने भरलेले खड्डे यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो आणि वाहने चालवणे अशक्य बनते.

चामोर्शी हरणघाट मार्ग हा खड्डेमय झाल असून प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष्य नाही तसेच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार व खासदार सुद्धा याकडे कानाडोळा केला आहे,सतत या रस्त्याच्या दुरुस्ती साठी मागणी होत असून प्रशासन दखल सुद्धा घेत नाही,या रस्त्याच्या दुरावस्था मुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत,जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशाने या रस्त्यावर जड वाहने नेण्यास प्रतिबंध असून सऱ्यास आदेशाची पायमल्ली करून मोठे मोठे जड वाहन ये जा करत होती तरी प्रशासन झोपेत होते,यामुळे परिणामी रस्त्याची अवस्था अगोदरपेक्षा दयनीय झाली आहे कुणालाच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची चिंता नाही,।रस्ते पक्के व्हावे यासाठी चक्का जाम आंदोलन सुद्धा पक्षाद्वारे करण्यात आला परंतु तात्पुरता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी थातूर मातूर काम करून वेळ मारून नेली,परंतु बांधकाम अधिकाऱ्याने साधे खड्डे बुजवून रस्ते जानेयोग्य करू शकले नाही,इतकी दयनीय परिस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे, रस्त्याच्या चक्का जाम आंदोलन वेळी सगळेच प्रशासकीय अधिकारी शब्द देऊन गेले परंतु शब्दाच पालन कुणीच अधिकारी करू शकले नाही यावरून दिसून येते अधिकारी हे किती कर्व्यनिष्ट आहे

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहोत, पण केवळ आश्वासनेच मिळत आहेत. प्रत्यक्षात कोणतेही काम होत नाही.”

या मार्गाची तातडीने दुरुस्ती व काँक्रीटीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments