शिवसेना मूल तर्फे भूजविण्यात आला बसस्थानक परिसरातील भला मोठा खड्डा.
बस आगार व प्रवाशांनी मानले आभार
गौतम जीवने मूल ; मूल तालुका स्थळी नव्याने बनविण्यात येत असलेल्या बसस्थानक गेटवर निकृष्ट कामामुळे भलामोठा खडा पडलेला आहे. या खड्या ने बस चालक, प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर ठिकाणी अपघात होऊन जीव जाण्याचे धोका नाकारता येणारे नसून अनेक किरकोड अपघात सुद्धा झाले आहेत. याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र कुठल्याच विभागणी दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी एक पाऊल समाजसेवेसाठी म्हणत शिवसेना मूल च्या वतीने काल रात्री वर्दळ कमी झाल्यानंतर खडया मध्ये काँक्रिटीकरण करून मोठा खडा बुजविण्यात आला.
शिवसेना जिल्हा प्रमुख मान.संदीप भाऊ गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना मूल तालुका प्रमुख राज ठाकरे, माजी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार मैत्री ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर आनंदराव कुळे, महेश चौधरी, सुनील काळे, ओमदेव मोहुरले, अमित आयलानी राहुल बारसागडे बादल करपे, शिवम चलावार ,दत्तू भाऊ चिटलोजवार संजय चिटमलबार इतर आजी माजी पदाधिकारी यांच्यासहकार्यतून खड्डा बुजविण्यात आला असून बसस्थानक पदाधिकारी चालक वाहक व प्रवाशांनी कार्याबद्दल शिवसेनेचे आभार मानले आहे.







