न्यू माउंट कॉन्व्हेन्ट चामोर्शी येथे शिक्षकदीन उत्साहात साजरा
चोमोर्शी प्रतिनिधी लोकवाद ; तालुक्यातील पोलिस स्टेशन समोरील न्यू माउंट कॉन्व्हेन्ट येथे बालकांच्या वतीने शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारत रत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने सर्वत्र शिक्षक दीन शाळेत दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याचेच अवचित साधत काही बालकांनी शिक्षक शिक्षीका चे वेश भूशा धारण करीत वर्गात मुलांना विविध विषयांचे धडे गिरविले. त्याबद्दल शाळा व पालकात आनंद व्यक्त केल्या जात असून न्यू माउंट कॉन्व्हेन्टचे संस्थापक दुर्योधन घोंगडे, तुषार कर्णे यांनी सुद्धा बालकांचे अभिनंदन केले आहे. बालक दिनाच्या निमित्ताने शैक्षणिक वाटचालीसाठी पण शुभेच्छा दिल्या आहेत.







