शिवसेना महिला आघाडी तर्फे पोलीस स्टेशन मुल येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
मुल प्रतिनिधी; सणासुदीच्या काळातही पोलीसांसमोर मोठी आव्हाने असतात. कर्तव्यासोबतच सार्वजनिक सुरक्षेची आणि उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. यामुळे सणासुदीच्या काळातही ते स्वतःच्या परिवाराला वेळ देऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी मुल जिल्हा चंद्रपूर यांच्या तर्फे त्यांची सेवा आणि कर्तव्यनिष्ठा यांची दखल घेत त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर भारतीताई राखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी मुल तर्फे पोलीस स्टेशन मुल येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला याप्रसंगी स. ठाणेदार राठोळ आणि इतर पोलीस बंधूंना राखी बांधून बहीण भावाच्या मधुर नात्याला जपत शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या बल्लारपूर विधानसभा प्रमुख शितलताई वेलपुलवार, मुल तालुका प्रमुख शालिनीताई खैरे, शाखा प्रमुख विद्याताई बावणे, मायाताई पोहनकर, प्रतीभाताई सादमवार,सवीताताई बुटले , आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.







