Homeगडचिरोलीनवेगाव ( रै) गावाच्या विकासाकरिता 'बाल स्नेही ग्राम पंचायतची' स्थापना

नवेगाव ( रै) गावाच्या विकासाकरिता ‘बाल स्नेही ग्राम पंचायतची’ स्थापना

नवेगाव ( रै) गावाच्या विकासाकरिता ‘बाल स्नेही ग्राम  पंचायतची’ स्थापना

प्रतिनिधि चामोर्शि,

ग्रामपंचायत, शिवानी विद्यालय,जिल्हा परिषद शाळा नवेगाव (रै) तथा ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने गावात ‘बाल स्नेही ग्राम पंचायतची’  (Child Friendly Panchayat) ची स्थापना  करण्यात आली.

पंचायत राज मंत्रालय यांच्या शाश्वत विकासाचे उद्देश ठेऊन ९ थीम अंतर्गत एक बाल स्नेही ग्राम पंचायत स्थापन करून मुलांच्या हिताची कामे करण्याचा उद्देशाने  ११ ते १८ वयोगटाच्या  73 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.’बाल स्नेही ग्राम पंचायत’ मध्ये ७ मुख्यमंत्रि पद आणि ७ उपमुख्यमंत्री पद यासह विविध मंत्रिपदांचा समावेश करण्यात आला.  शिक्षण मंत्री, उपशिक्षण मंत्री, बाल सुरक्षा मंत्री, उप बालसुरक्षा मंत्री, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री, आरोग्य व स्वच्छता मंत्री, अन्न व पोषण मंत्री, नियोजन मंत्री, माहिती व प्रसार मंत्री आणि त्यांच्या उपमंत्रिपदांचा समावेश यामधे प्रामुख्याने आहे. विद्यार्थ्यांना स्वतःमधील कला कौशल्याचा त्यांच्यातील सुप्त गुणांचा चांगला वापर कसा करता स्वतःच्या विकासा सोबतच गावाचा विकास करण्याची भूमिका पार कशी पाडता येणार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला असून या कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेवक मा. पी.एम दुर्गे यांनी केले तर शिवानी विदयालयाचे शिक्षक श्री दडवे, ता.समन्वयक दिनेश कामतवार  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी कार्यक्रमाला गावाचे सरपंच श्री डंबाजी खोडवे ,उपसरपंच श्री दिनकर दुधबळे,ग्रा.स. श्री माधव खोबे, सौ लता गेडाम,श्री रामचंद्र सातपुते, रंजना कुणघाडकर शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष,सदस्य, अंगणवाडी मॅडम व ग्रापंचायत सदस्य आणि तालुका समन्वयक दिनेश कामतवार तथा मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’ सदस्य तसेच युवा मार्गदर्शक पंकज शंभरकर,अश्विनी उराडे,सोनाली रणदिवे यांची उपस्थिती प्रामुख्याने होती

लवकरच बाल स्नेही ग्राम पंचायत सोबत त्यांची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी ग्रामपंचायत व मॅजिक बस त्यांच्यासोबत चर्चासत्र घेणार असल्याचे माहिती कामतवार यांनी दिली.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments