डोंगरहळदीची ग्रामदैवत असलेल्या घटमाऊली देवस्थानात नवरात्र महोत्सव
– पिढ्यानपिढ्या डोंगर हळदी गावाच्या रक्षणासाठी उभी आहे घटमाऊली माता
-मागील सात वर्षांपासून सुरू आहे नवरात्र महोत्सव
-भजन,कीर्तन,दांडिया,धार्मिक व सामाजिक कार्याची मांदीयाळी
पोंभूर्णा :- गावावर संकट येऊ नये म्हणून रक्षणकर्त्या देवीच्या रुपात डोंगरहळदी येथील डोंगरावर विराजमान घटमाउली माता गावाचे रक्षण करत उभी आहे.घटमाऊली लक्ष्मीमाता देवस्थान या नावाने तिला ओळखल्या जाते.मागील सात वर्षांपासून याठिकाणी नवरात्र निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो.नवसाला पावणारी व ग्रामदैवत असलेल्या घटमाऊलीच्या दर्शनासाठी नवरात्रात हजारोच्या संख्येने भक्तांची मोठी गर्दी उसळते.
निसर्गरम्य व पर्यटनस्थळ असलेला डोंगरहळदी गाव हजारो पर्यटकांना आकर्षित करीत असते.तिथे अनेक पिढ्यांपासून विराजमान असलेली घटमाऊली व महालक्ष्मी देवीची विलोभनिय मुर्ती श्रद्धाळू भक्तांना आकर्षित करीत असते. येथील घटमाउली माता व महालक्ष्मी भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.घटमाऊली मातेच्या मंदिरात अत्यंत पवित्र वातावरण पाहायला मिळते.उंच डोंगर,घनदाट जंगल, डोंगराच्या पायथ्याशी सतीकुंड आज त्याचे तलावात रुपांतर झाले आहे.मान्यता आहे की या ठिकाणी गोंड राजे व भोसले सेनापती सुद्धा घटमाऊलीचे दर्शन घेत होते असे पुराणे लोकं सांगतात.पिंढ्यांपिढ्या या गावातील व आजुबाजूच्या परिसरातील घटमाऊली इष्ट देवता होती.नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी मंदिरात घटमाऊलीचे घट मांडून अखंडज्योत प्रज्वलीत केली जाते.अखंडज्योत गावावर व भक्तांवर येणारी संकटे समुळ नष्ट करते असा विश्वास भक्तांना आहे.पहाटे व सायंकाळच्या आरतीला येथे विशेष महत्व आहे.यातील संध्याकाळच्या आरतीला श्रद्धाळू आवर्जून उपस्थित असतात.
———
गावावर संकट येऊ नये म्हणून घटमाऊलीची पुजा अर्चा पिढ्यानपिढ्या केली जात होती.घटमाऊलीची मुर्ती हि दगडात कोरलेली आहे.येथे असलेले मातीचे व लाकडाचे घोडे सुद्धा देवीसोबतच पुजल्या जायचे. गावातील सण, शउत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे.एवढेच नव्हे तर कोणतेही शेतीचे काम करताना प्रार्थना केली जायची.दुष्काळ पडू नये,नैसर्गिक संकटे येऊ नये, गावात रोगराई पसरू नये, काळ्या शक्तींपासून गावाचे रक्षण व्हावे यासाठी कुलदैवत म्हणून घटमाऊलीची पुजा अर्चा केली जात होती.मान्यता आहे की या ठिकाणी या भागात राज्यकर्ते असलेले गोंड राजे व भोसले सेनापती येथे दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे.१९८५ मध्ये महसूल विभागाने या डोंगराची गिट्टी,रवाडी गोट्याची लिज दिली होती.अनेक वर्ष तिथे काम आज डोंगरावर घट माऊली व महालक्ष्मी मातेचे २०११ मध्ये सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे.नवरात्रीच्या या काळात हा परिसर आणखीनच भक्तीमय बनलेला असतो.देवस्थानाची देखरेख घटमाऊली देवस्थान सेवा समितीकडून केली जाते.यात पन्नास सभासद आहेत.हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे.याला तिर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे.
——-
संपूर्ण डोंगर व मंदिराला आकर्षक रोषणाईने सजवले आहे.निसर्गाने नटलेला तलाव (सतीकुंड)व महालक्ष्मी माता व घटमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची नवरात्र उत्सवात मोठी गर्दी असते. या परिसरातील आकर्षक रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधत आहे.येथील गरभा कार्यक्रम पहायला दहा हजार लोकांची गर्दी असते.पर्यटकांच्या व श्रद्धालूंच्या सोयीसाठी उत्तम पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
भजन,कीर्तन,दांडिया,नृत्यस्पर्धा,भागवत,वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,सामान्य ज्ञान स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.







