Home चंद्रपूर फाटल्या चप्पलाला टाके मारता येते गा पण फाटक्या नशीबाला कसं मारू !

फाटल्या चप्पलाला टाके मारता येते गा पण फाटक्या नशीबाला कसं मारू !

0
355

फाटल्या चप्पलाला टाके मारता येते गा पण फाटक्या नशीबाला कसं मारू !

विठ्ठल काकाच्या कामाची भक्ती सुरू होते चप्पलाला टाके मारून

– उत्कृष्ट सइनी वादक असलेला विठ्ठल काका राहिला प्रशासनाकडूनही उच्छूतच

पोंभूर्णा :-नशीबाने दरिद्री दिली असली तरी भिकेसाठी कधीच कुणाला हात न पसरवता पंच्याहत्तरी पार केलेल्या म्हातारपणातही स्वावलंबी व आत्मनिर्भर आयुष्य जगणारा विठ्ठलकाका पिढ्याचा चालत आलेला जोडे चप्पला शिवण्याच्या आपल्या व्यवसायातून उदरनिर्वाह करतोय.जातीमुळेच असं दारिद्र्य भोगावं लागत आहे असं स्पष्ट बोलत फाटल्या चप्पलाला टाके मारता येते गा पण नशीबाला टाके कसं मारू असा परखड सवाल आयुष्यालाच करत तो आत्मसन्मानाने आत्मनिर्भर जीवन जगत आहे.रोज सकाळी ९ वाजता आरी-रंपीला नमन करीत विठ्ठल काका बस स्टॅण्डवर कामाच्या भक्तीची सुरूवात फाटल्या चप्पला शिवण्याचा काम करतो.विठ्ठल शंकर इप्पलवार हा पंचाहत्तर वर्षांचा नम्र माणूस पोंभूर्णा बस स्टॅण्ड चौकात फक्त एका थैल्यात मावणारं दुकान घेऊन फुटपाथवर बसतो.थैलीतल्या आयुष्यासाठी.

पोंभूर्णा बस स्टॅण्डवरील फुटपाथवर थैलीत मावणारं जोडे चप्पला दुरुस्तीचा विठ्ठल काकांचं दुकान आहे.कुणी दोन रूपये दिलं,कुणी पाच रुपये दिलं,कुणी दहा रुपये दिलं तरी खुशीनं मालकीण,मालक म्हणत स्विकारून हासत राहणारा विठ्ठल काकांचा स्वभाव हि त्यांची हटके असलेली आयडेंटिटी आहे.कुणी फुकट काम करून गेला तरी तक्रार नाही.रोज कमावलेल्या मिळकतीतून घरच्या चुलीचा समाचार घेतला जातो.पण कठीणाईच्या कुशीतही आयुष्य आनंदाने जगणं शिकावं विठ्ठल काकाकडून.सकाळी ९ वाजता काखेत आरी रंपीचा झोरा धरून बस स्टॅण्ड चौकात यायचं.आणि चप्पला दुरुस्तीचा पसारा पसरून देवबाप गिऱ्हाईकाकडे येण्याची वाट बघायची.खरं तर विठ्ठल काकांची भक्तीच मुळातून चप्पलाला टाके मारून सुरू होते.पोटातल्या भुकेचं संघर्ष मिटवण म्हातारपणात तरी सोपं नसतं.म्हातारपणात तो कामासाठी धडपडतोय,कुटुंबासाठी धडपडतोय.दिवसाकाठी कधी पन्नास,कधी शंभर तर कधी खाली हाथ पण तरीही दुसऱ्या दिवसासाठी जिद्द सुरूच.ती आजही सुरुच आहे.

——————————————-

विठ्ठल काका हे उत्कृष्ट सयनी वादक आहेत. त्यांच्या सयनीला कुठेच तोड नाही.पोंभूर्णा तालुक्यात कुठेही कार्यक्रम असो विठ्ठल काकाला बोलावणं व्हायचं.लहान पणापासून सयनी वाद्याची व्रत्यस्थ आराधना करूनही आर्थिक मायाची गणित कधी जमवता आली नाही.सयनीच्या या साधकाची शासनानेही दखल घेतली नाही.कलावंताला मिळणाऱ्या मानधनाच्या यादीतही त्यांना स्थान मिळालं नाही.कलावंत म्हणून मनोभावे सेवा करून त्यांना कलावंत म्हणून मानधन न मिळणं हि त्यांची झालेली थट्टाच आहे.

——–

अश्यातच अनेक वादळं विठ्ठल काकानं‌ झेललं आहे.नुकताच सहा महिण्या अगोदर विठ्ठल काकाचं ३६ वर्षाचा लहान मुलगा विनायकचा मृत्यू झाला.वडिल म्हणून मुलाचं मृत्यू पचवणं कठीण असतं.हा विषाचं घोट घेऊन विठ्ठल काकानी नातवंडासाठी कंबर कसली.म्हातारपणात तो कामासाठी धडपडतोय,कुटुंबासाठी धडपडतोय.दिवसाकाठी कधी पन्नास,कधी शंभर तर कधी खाली हाथ पण तरीही दुसऱ्या दिवसासाठी जिद्द सुरूच.ती

——————————————-

विठ्ठल काका हे उत्कृष्ट सयनी वादक आहेत. त्यांच्या सयनीला कुठेच तोड नाही.पोंभूर्णा तालुक्यात कुठेही कार्यक्रम असो विठ्ठल काकाला बोलावणं व्हायचं.लहान पणापासून सयनी वाद्याची व्रत्यस्थ आराधना करूनही आर्थिक मायाची गणित कधी जमवता आली नाही.सयनीच्या या साधकाची शासनानेही दखल घेतली नाही.कलावंताला मिळणाऱ्या मानधनाच्या यादीतही त्यांना स्थान मिळालं नाही.कलावंत म्हणून मनोभावे सेवा करून त्यांना कलावंत म्हणून मानधन न मिळणं हि त्यांची झालेली थट्टाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here