जिल्हा निवड समिती मार्फत जिल्ह्यात गट-क व गट-ड या पदांची स्थानिक भारती करण्यात यावी
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे ना. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन
प्रतिनिधी चामोर्शी,
जिल्ह्यातील जिल्हा निवड समिती मार्फत जिल्ह्यात गट-क व गट-ड या पदांची स्थानिक भरती करण्यात यावी. या मागणीला घेऊन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ चामोर्शी तालुक्याचे वतीनेजाऊन.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणार्या गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची फारशी साधने उपलब्ध नसल्याने अनेक युवक बेरोजगार आहेत. त्यातच एकादी सरकारी भरती निघाली की त्यात जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील नवे तर राज्यातीलच बेरोजगार तरुण तरुणी अर्ज दाखल करतात त्यामुळे स्थानिक युवकांना अर्ज करून काहीच लाभ मिळत नाही या समस्येची जान ठेऊन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ चामोर्शी तालुक्याचे वतीने जिल्ह्यातील स्थानिक युवकांना याचा लाभ मिळेल या मागणीला घेऊन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा निवड समिती मार्फत जिल्ह्यात गट-क व गट-ड या पदांची स्थानिक भरती करण्यात यावी या मागणीला घेऊन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. श्री.धर्मरावबाबा आत्राम यांच्या अहेरी येथील निवासस्थानी जाऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर युवती जिल्हाध्यक्ष संतोषी सुत्रपवार. जिल्हा उपाध्यक्ष विनोद किरमे.प्रमुख कार्यकर्ते अजय सोमनकर, महेंद्र लटारे. नागेश बारसागडे व राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे युवक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.







