Homeगडचिरोली“महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा गडचिरोलीत एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा व बेमुदत साखळी...

“महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा गडचिरोलीत एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा व बेमुदत साखळी उपोषण, महेंद्र ब्राम्हणवाडे यांची आंदोलनस्थळी भेट”

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली:-

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार युवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतील प्रशिक्षित युवकांनी गडचिरोली येथे एकत्र येत जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात आला तसेच बेमुदत साखळी उपोषणालाही सुरुवात करण्यात आली.

या आंदोलनास  काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला व त्यांनी प्रशिक्षणार्थी युवकांशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

अनेक युवकांनी यावेळी सांगितले की, ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करूनही त्यांना रोजगार उपलब्ध झालेला नाही. तसेच प्रशिक्षण कालावधीत मिळणारे मानधन वेळेवर मिळाले नसून, काही ठिकाणी पूर्ण मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक प्रशिक्षणार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या कुटुंबांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.

प्रशिक्षणार्थ्यांच्या व्यथा ऐकताच महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करत राज्य सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, शासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करूनही युवकांना ना रोजगार मिळतो, ना त्यांचे हक्काचे मानधन वेळेवर दिले जाते—ही अत्यंत गंभीर बाब आहे.

ते पुढे म्हणाले की, युवकांनी ११ महिने प्रामाणिकपणे काम करूनही त्यांच्या हातात कोणतीही स्थिरता नाही. त्यामुळे युवकांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर मोठा आर्थिक व मानसिक ताण निर्माण झाला आहे. शासनाने केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याऐवजी तात्काळ ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

तसेच त्यांनी इशारा देत सांगितले की, शासनाने या प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होईल आणि राज्यभर त्याचे परिणाम दिसून येतील.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, बालाजी पा. चातुरकर साहेब (लातूर),राजेश ठाकूर, विजय लाड, सौं.मेश्राम ताई, सौं. स्वेता सातारे, नेपाल मारगाये, राहुल वासनिक, कल्पक चंद्रगिरे, किशोर फटिंग,धिवरू मेश्राम, नदीम नाथानी, गौरव येणप्रेडीवार, विपुल येल्टीवार व विविध जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments