Homeगडचिरोलीशेतीच नसेल तर प्रश्न विधानसभेत मांडून काय उपयोग?” — NSUI चा उद्योग...

शेतीच नसेल तर प्रश्न विधानसभेत मांडून काय उपयोग?” — NSUI चा उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांना निवेदन.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली/चामोर्शी – भेंडाळा परिसरातील प्रस्तावित MIDC प्रकल्पाविरोधात NSUI कडून राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांना निवेदन देत प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यापूर्वी समितीच्या वतीने आंदोलनही करण्यात आले होते.दरम्यान, YIN मंत्रालय,मुंबई कार्यक्रमानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपस्थित असताना संबंधितांना हे निवेदन देण्यात आले.हे निवेदन राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली ओमकार रोंनगे NSUI जिल्हा महासचिव वर्धा यांच्याकडून देण्यात आले. NSUI सांगितले की, भेंडाळा परिसरातील सुपीक शेती जमीन अधिग्रहित झाल्यास हजारो कुटुंबे भूमिहीन होतील. तसेच, औद्योगिक प्रकल्पामुळे प्रदूषण वाढून आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.याशिवाय, NSUI इशारा देत सांगितले की, जर MIDC प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात आला नाही, तर येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल.दरम्यान, सर्व ग्रामसभा आणि शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध असून, भेंडाळा परिसरातील प्रस्तावित MIDC तात्काळ रद्द करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments