HomeBreaking Newsतळोधी येथे स्कॉर्पिओ-ट्रॅव्हल्स भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

तळोधी येथे स्कॉर्पिओ-ट्रॅव्हल्स भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

अपघातातील जखमींवर तातडीने उपचार करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

गडचिरोली:-

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील तळोधी येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींवर तातडीने व गुणवत्तापूर्ण उपचार करावेत तसेच सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आरोग्य प्रशासनाला दिले.

आज सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास कुरुल-रामपूर येथून भाडभिडी (मो.) येथे लग्नासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ (MH 46 P 5392) वाहनाची गडचिरोलीकडून येणाऱ्या प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल्स (MH 15 CK 5005) या वाहनाशी तळोधी येथील नवीन पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार डॉ मिलिंद नरोटे, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व श्री गोकुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे उपस्थित होते. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कोणतीही कुचराई होऊ नये, आवश्यक औषधे, मनुष्यबळ व यंत्रणा तत्काळ उपलब्ध करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच जखमींच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करण्याबाबतही सूचना दिल्या.जिल्हाधिकाऱ्यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी अपघातातील जखमींना तळोधी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतांची नावे
(1)अनिकेत बर्लावार वय 26 वर्षें राहणार भाडभीडी
(2) आरोही मोगरकर वय 08 वर्षें रा . गट्टेगुडा
(3) सुमन गव्हारे वय 60 वर्षें राहणार कुणघाडा
(4) विमलाबाई गव्हारे वय 60 वर्षें रा. कुणघाडा

जखमीची नावे
(1)गुरुदेव कुणघाडकर वय 60 वर्षें राहणार भाडभीडी
(2) सुधाकर कुणघाडकर वय 60 वर्षें राहणार भाडभीडी
(3) वेदांत वैरागडे वय 22 वर्षे रा. भाडभीडी
(4) प्रतिमा मानमुडकर वय 35 वर्षें रा. गिलगाव
(5)निखिल दराडे रा. भाडभीडी वय 17 वर्षें
(6)संजय वैरागडे वय 17 वर्षें रा. भाडभीडी
(7) कुणाल कन्नाके वय 21 वर्षें रा. भाडभीडी
(8)रेखा चलाख वय 55 वर्षें रा. जुनोना
(9) अमर चलाख वय 57 वर्षें रा. जुनोना
(10)देवाजी गव्हारे वय 55रा. कुणघाडा
(11) गुरूदास वासेकर वय 60 वर्षें राहणार भिवापूर

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments