Homeगडचिरोलीशिवणी येथे 29 मार्चला शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र; जमीन अधिग्रहणाविरोधात पुढील दिशा ठरणार

शिवणी येथे 29 मार्चला शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र; जमीन अधिग्रहणाविरोधात पुढील दिशा ठरणार

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली : जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांमध्ये वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर 29 मार्च रोजी शिवणी येथे भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात अधिग्रहणाच्या मुद्द्यावर पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी व जयरामपूर परिसरातील जमीन अधिग्रहणानंतर भेंडाळा परिसरातील 14 गावांमध्येही अशाच प्रकारचा प्रयत्न झाला होता. स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही आता पुन्हा चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील सुमारे 30 ते 35 गावांमध्ये जमीन अधिग्रहण होणार असल्याच्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र होणार आहे. अधिग्रहणाचा फटका बसणाऱ्या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
📍 ठिकाण : शिवणी, ता. जि. गडचिरोली
📅 दिनांक : 29 मार्च 2026
⏰ वेळ : दुपारी 1.00 वाजता
या चर्चासत्रातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका ठरवून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments