अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीन फाईल्स संदर्भातील काही माहिती जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर, त्या प्रकरणातील गंभीर आरोपांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
याच मुद्द्यावरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व इतर सहकारी पक्षांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर संयुक्त मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात पार पडला.
मोर्चात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते व राज्यभरातील काँग्रेस आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.