जिल्ह्यातील के.जी. ते पि.जी. स्तरापर्यंत काम करण्याऱ्या खाजगी अनुदानित, कायम विना अनुदानित आश्रमशाळा, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न हिरिरीने निकाली काढणाऱ्या राज्यव्यापी लढवय्ये संघटन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चे जिल्हा अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे १५ मार्च रोजी संपन्न होत आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन नागपूर विभागाचे कार्यवाह संतोष सुरावार यांनी केले आहे
या अधिवेशनासाठी , १५ मार्च २०२६ ला सकाळी ८.३० ते ९.३० : सभासद नोंदणी तर सकाळी ९.३० ते १०.३० तक्रार निवारण तर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सागर आडे, जिल्हा कार्यवाह गडचिरोली,, नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, यांच्यासह अधिवेशनात नागो गाणार माजी आमदार वि. प. स. तथा राज्य कार्याध्यक्ष म.रा.शि. प. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या अधिवेशनात NPS, RPS, GPS, UPS व OPS यांचे तुलनात्मक मार्गदर्शन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, शिक्षक पात्रता परिक्षा (टेट) यावर संघटनेची भूमिक, चतुर्थश्रेणीकर्मचारी पद पुनर्स्थापित करणे, मराठी माध्यमांच्या शाळांचे भवितव्य व अस्तित्व,आश्वासित प्रगती योजना १०,२०,३०, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन आदी विषयावर चर्चा, व मंथन होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार अशोक नेते यांनी तर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अनिल नूतीलकंठावार व स्वागताध्यक्ष आमदार डॉ मिलींद नरोटे, माजी आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पूज ताई चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ देवराव होळी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत यावेळी दुपारी खुल्या चर्चासत्रात महेश तुम्मपल्लीवार व विश्वजित लोणारे हे मार्गदर्शन करतील असे माहिती संतोष सुरावार यांनी दिली असून या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे