Homeगडचिरोलीभेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन गडचिरोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो...

भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन गडचिरोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांचे धरणे

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

गडचिरोली :
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी सुपीक शेतीजमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने १२ मार्च २०२६ रोजी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.
आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडन करून आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे तसेच ह.भ.प. मुरलीधर महाराज हरणघाट यांनीही मुंडन करून आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. भेंडाळा परिसरातील सुपीक शेतीजमीन अधिग्रहित केल्यास हजारो शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल, त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, भेंडाळा परिसरातील जमीन अत्यंत सुपीक असून येथील शेतकरी शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. उद्योगाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमीन हिरावून घेणे अन्यायकारक आहे. शासनाने हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरून ते विधिमंडळापर्यंत तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. शेतकऱ्यांच्या जमिनींचे जबरदस्तीने अधिग्रहण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनिल कोठारे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, माजी जि.प. सदस्य कविता भगत, विजय लाड, प्रतीक बारसिंगे, उत्तम ठाकरे, श्रीनिवास ताडपलीवार, संजय गावडे, संजय चन्ने, हरबाजी मोरे, नदीम नाथानी, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, प्रेमानंद गोंगले, राहुल वैरागडे, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकार, जावेद खान, सौ. कल्पना नंदेश्वर, सौ. कविता उराडे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. रिता गोवर्धन, सौ. मंजू आत्राम, सौ. मीनल चिमूरकर आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच शेतकरी बचाव जनआंदोलन समिती भेंडाळाचे अध्यक्ष मनोज पोरटे यांच्यासह भुवनेश्वर चौधरी, सुधीर शिवणकर, सतीश फुटकंवार, दिगंबर धानोरकर, सुखसागर झाडे, परशुराम किरणे, विठ्ठल पाल, रवी धोटे, संजय खेडेकर, प्रीतम देशमुख, देवानंद दुर्गे, रविंद्र वाडगुरे, विजय झाडे, राजकुमार घोगरे, लचमा शिरगांवार, अनंत चौधरी, रूपचंद जीवनकर, गुरुदास चौधरी, सदानंद जवादे, विवेक भगत, तोताजी आभारे, सचिन सातपुते, आनंदराव सातपुते, अभिजीत सातपुते, रविंद्र चुनारकर, चरण पोरटे, विकास रायसिडाम, नामदेव किनेकर, देवानंद तुमडे, दादाजी कुठे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, हजारो शेतकरी बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments