HomeBreaking NewsSRPF गट क्र.13 विसोरा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; 210 रुग्णांची तपासणी

SRPF गट क्र.13 विसोरा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; 210 रुग्णांची तपासणी

SRPF गट क्र.13 विसोरा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; 210 रुग्णांची तपासणी

विसोरा (ता. वडसा) प्रतिनिधी लोकवाद : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13, विसोरा (ता. वडसा, जि. गडचिरोली) येथे राज्य राखीव पोलीस बलाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर, आरोग्य विभाग गडचिरोली व SRPF गट क्र.13 कॅम्प विसोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.

कॅम्प परिसरालगतच्या सुमारे 10 ते 11 गावांतील नागरिकांना विविध आजारांची मोफत तपासणी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आवश्यकतेनुसार रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या आरोग्य शिबिरात नेत्ररोग, सर्जरी, त्वचारोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, वातरोग आदी तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. तसेच विविध रक्त तपासण्यांचाही समावेश होता. विसोरा, तुलसी, शंकरपूर, तुकूम, चोप, कोरेगाव व तमाशी आदी गावांतील एकूण 210 गरजू रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया आवश्यक आहे, अशा रुग्णांवर नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी 6 मार्च रोजी राज्य राखीव पोलीस बलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील सहभागी पोलीस अधिकारी, अंमलदार, अंमलदारांचे कुटुंबीय तसेच वाचनालयातील विद्यार्थ्यांना SRPF समादेशक श्री. नारायण शिरगांवकर यांच्या हस्ते बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला समादेशक सहाय्यक श्री. ललित मिश्रा, सहाय्यक समादेशक श्री. मारोती लांबेवार, पोलीस निरीक्षक मधुकर मोर्ला, पोलीस निरीक्षक दीपक पवार, पोलीस उपनिरीक्षक फुलबंधे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ढाले यांच्यासह पोलीस अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच शिबिराला आलेल्या नागरिकांसाठी SRPF गट क्र.13 च्या वतीने निशुल्क भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments