Homeगडचिरोलीअतिदुर्गम भागातील युवकाची मोठी झेप; राहुल वैरागडे यांची NSUI जिल्हाध्यक्षपदी निवड, जिल्हाभरातून...

अतिदुर्गम भागातील युवकाची मोठी झेप; राहुल वैरागडे यांची NSUI जिल्हाध्यक्षपदी निवड, जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

गडचिरोली | चामोर्शी
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून सामाजिक व विद्यार्थी चळवळीतून घडलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याची थेट जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. NSUI (विद्यार्थी काँग्रेस) च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी राहुल वैरागडे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
युवा संकल्पचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ओळख असलेले राहुल वैरागडे हे झुंजार नेतृत्व व तळागाळातील कामासाठी परिचित आहेत. गोरगरीब, दिनदुबळ्या समाजासाठी सातत्याने केलेले सामाजिक उपक्रम, विद्यार्थी प्रश्नांवर लढाऊ भूमिका आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेण्यात येऊन त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम यांसह पक्षातील सर्व वरिष्ठ नेतेमंडळी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
“विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देत संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा माझा संकल्प आहे. संघटनेने दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन,” अशी ग्वाही राहुल वैरागडे यांनी दिली.
त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments