Homeगडचिरोली५ वर्षं चेहरा नाही, काम नाही — वॉर्ड 17 ने नगरसेवकांना ‘नॉट...

५ वर्षं चेहरा नाही, काम नाही — वॉर्ड 17 ने नगरसेवकांना ‘नॉट फाउंड’ घोषित केले!

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

🔥 गप्पा गाजवल्या, विकास बुडवला — वॉर्ड 17मध्ये ‘गायब’ नगरसेवकांचे बिंग उघड!

चामोर्शी : नगर पंचायत चामोर्शीच्या वॉर्ड क्रमांक 17 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली असून “अशा निष्क्रिय नगरसेवकांना आता या वॉर्डात जागा नाही” अशी बोंब नागरिक ठोकत आहेत. निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या ‘विकास’ाच्या घोषणा, आश्वासने आणि गोड बोलणी करणारे नगरसेवक, निवडून आल्यानंतर तब्बल पाच वर्षांपासून वॉर्डात ‘बेपत्ता’ असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निवडणुकीत ‘रस्ते, नाली, पाणी पुरवठा, स्वच्छता’ अशा सुविधा व विकासाचे डोंगर दाखविण्यात आले. मात्र, वास्तवात विकास शून्य, काम शून्य, उपस्थिती शून्य अशी कडवी परिस्थिती असल्याचे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले. ‘‘पाच वर्ष झाली, चेहरा तरी दिसला का?’’ असा सवालही नागरिकांनी केला.
दरम्यान, वॉर्डात मूलभूत सुविधा, दैनंदिन स्वच्छता व्यवस्था, रस्ते, दिवे, नाली बांधकाम यांसारख्या मुद्द्यांवर काहीही काम न झाल्याचा आरोप पुढे येत असून, पुन्हा निवडणुकीचे वातावरण जवळ येत असताना नागरिकांनी निष्क्रिय व अदृष्य नगरसेवकांपासून मुक्तीची मागणी जोर धरली आहे.
लोकशाहीमध्ये जनप्रतिनिधी हा जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा समजला जातो. मात्र वॉर्ड क्रमांक 17 मधील वास्तव चित्र पूर्णपणे उलटे असल्याचे जनमानस म्हणत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘विकासाचे घोषणापत्र नव्हे, प्रत्यक्ष कामाची पावती’ अशी मागणी नागरिकांनी पुढे केली आहे.

 

आता वॉर्ड क्रमांक 17 चे नागरिक जुन्या निष्क्रिय नेत्यांना नाकारून, प्रत्यक्ष काम करणारा तल्लख आणि जबाबदार युवा चेहरा नगरसेवक म्हणून पाहू इच्छितात,” असा सूर स्थानिकांमध्ये ऐकू येत आहे.”

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments