दुबईत सुवर्णझळाळी : आष्टीची श्वेता कोवे एशियन युथ पॅरा गेम्स 2025 मध्ये अव्वल
दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्स 2025 तिरंदाजी स्पर्धेत महिला गटातून सुवर्णपदक पटकावत वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टीची विद्यार्थिनी कु. श्वेता भास्कर कोवे हिने भारतासह गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे.
श्वेताच्या ऐतिहासिक यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले असून प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षक, विद्यार्थी तसेच संस्थेच्या वतीने कु. श्वेता कोवे व प्रा. डॉ. श्याम कोरडे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES







