Homeगडचिरोलीशिस्तभंग सूचना असूनही गडचिरोली खनिकर्म कार्यालयात कर्मचारी ‘नो-आयडेंटिटी कार्ड’ मोड.

शिस्तभंग सूचना असूनही गडचिरोली खनिकर्म कार्यालयात कर्मचारी ‘नो-आयडेंटिटी कार्ड’ मोड.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

शासनाचा आदेश हवेत; खनिकर्म कार्यालयात ‘आयडेंटिटी कार्ड’ बेपत्ता!”

खनिकर्म अधिकारी स्वतः चेंबर मध्ये गायब पण अनोळखी 3 व्यक्ती मस्त थाटात बसून. 

 

गडचिरोली : जिल्हा खनिकर्म कार्यालय यांच्या दालनात गेल्यानंतर उघड झालेला प्रकार हा सरळसरळ शासन आदेशांची पायमल्ली असल्याचे स्पष्ट दिसते. कार्यालयात कोण कर्मचारी आणि कोण खाजगी व्यक्ती हे ओळखणेच कठीण झाले. केवळ एक व्यक्तीच गळ्यात ओळखपत्र लावून दिसली; तर बाकीचे सर्वजण बिना-आयडेंटिटी कार्ड कार्यालयात वावरत होते. काहीजण तर फाईल हाताळताना दिसले, पण ते शासकीय कर्मचारी की अनधिकृत व्यक्ती—हे ओळखण्याचा मार्गच नव्हता!

शासनाने सर्व कार्यालयांना स्पष्ट आदेश दिले आहेत की प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्याने गळ्यात ओळखपत्र धारण करणे अनिवार्य आहे. हा नियम न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही सरकारने वेळोवेळी काढले आहेत.

मात्र, गडचिरोली जिल्हा खनिकर्म कार्यालयात हा नियम पूर्णपणे डावलला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. हे पाहून असे वाटते की इथे नियम फक्त कागदापुरते असून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा शून्य मागोवा आहे.

फाईल हाताळणारे कोण? कर्मचारी की बाहेरचे?

कार्यालयात काही अनोळखी व्यक्ती फाईल शोधताना दिसल्या.

त्यांची ओळख पटवण्यासाठी गळ्यात आयडेंटीटी कार्ड तर दूरच—

कोण येतो, कोण बसतो आणि कोण फाईल हाताळतो याची शासकीय चौकटच नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.

शासन आदेश असूनही बेफिकिरी

ओळखपत्र अनिवार्य

कार्यालयीन परिसरात केवळ अधिकृत कर्मचारीच

कामकाजाची पारदर्शकता

पण या सर्व गोष्टींची धडकपणे पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसते.

विभागाचा सुटेलावा की दुसरे काही?

जिल्हा खनिकर्म कार्यालयासारख्या संवेदनशील विभागात

अनधिकृत व्यक्तींना फाईल्सपर्यंत प्रवेश असणे ही गंभीर बाब आहे.

लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अर्जदार यांच्या प्रश्नांवर योग्य उत्तर न मिळण्यामागे अशा बेफिकिरीची मोठी भूमिका असू शकते.

उत्तरदायित्व कुणाचे?

शासनाने आदेश दिले तरी विभाग पाळत नाही;

कर्मचारी कार्यालयात असले तरी ओळख नाही;

फाईल कुणी हाताळत आहे हे सांगणारा नाही.

आणि मग प्रश्न उभा राहतो—

“ही बेफिकिरी कोणाच्या आशिर्वादाने?”

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments