Homeगडचिरोलीयशोधरा विद्यालय चामोर्शी येथे संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी.

यशोधरा विद्यालय चामोर्शी येथे संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी -यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य शाम रामटेके, ज्येष्ठ शिक्षक राजू धोडरे,प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. प्रशांत वालदे, प्रा. प्रविण गव्हारे , रेवनदास उंदिरवाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन राजू धोडरे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शाम रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संताजी जगनाडे महाराज यांच्या विविध पैलुंवर भाष्य करत आपण जाती जातीत गुरफटुन जातीत महापुरुष शोधत बसलोत , जे योग्य नाही . तर स्त्री आणि पुरुष याच खऱ्या दोन जाती आहेत , असे विचार विचार मांडून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
तसेच विद्यालयात भाषण स्पर्धा व गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व चामोर्शी शहरात रॅली काढण्यात आली .
संचालन जयश्री कोठारे तर
आभार सरिता आखाडे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण नैताम, लोकनाथ दुधबळे, निलेश क्षिरसागर, प्रा. प्रदीप भांडेकर, गुरुदेव सातपुते , लक्ष्मण गव्हारे, करुणा रामटेके, आशाताई उंदीरवाडे यांनी सहकार्य केले .

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments