टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी आज चामोर्शी तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती तर्फे तहसील कार्यालय येथे एक दिवसाचे आंदोलन करून तहसीलदार साहेबांच्या मार्फ़तिने शासनाला निवेदन पाठवण्यात आले.याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकारी यांनी आपापले मतं मांडले, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या TET विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास अनावश्यक विलंब केला जात आहे. तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या TET व इतर प्रलंबित मागण्या अनेक वर्षे प्रलंबित राहिल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष तीव्र होत आहे. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक व संवेदनशील दृष्टिकोनातून त्वरित निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.. शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक घटक आहे. शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांचा विश्वास संपादन करावा. मात्र, शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करतील, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबई येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल.त्याचा पहिला टप्पा म्हणून आज ५ डिसेंबर रोजी सर्व राज्यभरातील शाळां बंद आहेत.याप्रसंगी राजेश बाळराजे जिल्हा नेते ,संतोष गोटमुकुलवार जिल्हा सहसचिव ,पुरुषोत्तम पिपरे सल्लागार ,जनार्धन गेडाम सरचिटणीस , अविनाश बारसागडे कार्याध्यक्ष , उमेश जेंगठे ,रवींद्र घोंगडे , राजेश मूलकलवार ,संतोष मेंदाळे ,गुरूदास सोमनकर ,मार्कंडी मिटपल्लिवार तसेच चामोर्शी तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका वर्ग उपस्थित होते.