सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

राज्यात लाखो पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेले बेरोजगार तरुण असून शिक्षणाचा दर्जा गुणवत्तापूर्ण शिक्षक नियुक्त नसल्याने ढासाळला जात असून सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील 18 हजार पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणार असल्याने समूह शाळा गोंडस योजना सुरू करून कायमच्या त्या त्या शाळा बंद करू करण्याचं षडयंत्र सुरू असल्याने अघोषित शिक्षक भरती बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे .राज्यातील सर्व पात्र शिक्षक नैराश्य ग्रस्त अवस्थेत गेले आहेत ग्रामपंचायत सरपंच ते आमदार, शिक्षणमंत्री,उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री प्रत्येकी तीन तीन वेळा निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही ठोस उत्तर मिळत नसल्याने उमेदवारांकडून हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन व यशवंत स्टेडियम ते संविधान चौक जन आक्रोश मोर्चा माध्यमातून बेरोजगार अभियोग्यता धारक न्याय मिळवण्यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी एल्गार आंदोलन आयोजित केले आहेत पवित्रपोर्टलमुळे हजारो गुणवंत उमेदवारांना रोजगार मिळाला असला तरी काही गैरप्रकार, अपारदर्शकता आणि विलंबामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.परीक्षा होऊन सात महिने लोटली तरीही कोणत्याही प्रकारची पवित्र पोर्टलवर हालचाल दिसून येत नसल्याने पुढील बाबींवर त्वरित निर्णय घेण्यात यावा म्हणून विविध प्रकारच्या मागण्या घेऊन हिवाळी अधिवेशन आंदोलन करण्यात येणार आहे.
1. राज्यातील सर्व रिक्त पदांवर नवीन शैक्षणिक धोरणानुसार कंत्राट शिक्षकभरती ऐवजी कायमस्वरूपी 100% शिक्षकभरती करून शैक्षणिक दर्जा उंचवावा.
2)समूह शाळा योजना बंद करण्यात यावी
3. “एक भरती, एक पद” तत्त्वानुसार प्रक्रिया राबवावी; उमेदवाराने पद न स्वीकारल्यास त्याला पुढील प्रक्रियेतून वगळावे.
3. अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, समांतर आरक्षणातील रिक्त पदांचे रूपांतर करून प्रतीक्षा यादी जाहीर करावी.
4. संचमान्यता धोरण रद्द करून डी.एड./बी.एड. पात्र उमेदवारांना पोर्टलमार्फत संधी द्यावी.
5. भरती ही केंद्रीय पद्धतीनेच पारदर्शकतेने राबवावी.
6. मुलाखत प्रक्रियेत अनियमितता टाळण्यासाठी उमेदवारांच्या उपस्थितीचे पुरावे बंधनकारक करावेत.
7. मनपा, नपा व कटक मंडळातील सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलवरून भरावीत.
8. दोनदा TAIT परीक्षा दिलेल्या उमेदवारांना बाद करावे.
9. सर्व विषयांतील (कला, क्रीडा, कार्यअनुभव, संगणक इ.) शिक्षक भरती पूर्ण क्षमतेने करावी.
10. जाहिरात ही आरक्षणाच्या टक्केवारी नुसार न देता, सर्वच प्रवर्गांची मागील 100% अनुशेष भरून पदे जाहीर करावी.
11. आश्रमशाळा व समाजकल्याण शाळांची भरतीही पोर्टलवरूनच करावी.
12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे 1 ते 10 वी रोस्टर पूर्ण करून जाहिरात करावी.
13. शिक्षणसेवक कोणत्याही प्रकारचा विमा, अनुकंपा सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ 16 हजार मानधनात त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने ते मानधन 40 हजार करावे.







