HomeBreaking Newsगडचांदूर नगरपरिषद निवडणूक धक्कादायक प्रकार प्रभाग क्र. 9 मध्ये मतदानादरम्यान EVM...

गडचांदूर नगरपरिषद निवडणूक धक्कादायक प्रकार प्रभाग क्र. 9 मध्ये मतदानादरम्यान EVM वाद;

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

नगारा’वर बटन दाबले तरी ‘कमळ’चा दिवा लागला! संतप्त मतदाराने मशीन फोडले; पोलिसांनी ताब्यात घेतले.

चंद्रपूर(गडचांदूर):-

चंद्रपूर जिह्यातील गडचांदूर | नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग क्र. 9 मधील हिंदी–सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘नगारा’ चिन्हासमोरील बटन दाबले तरी EVM मशीनवर ‘कमळ’च्या चिन्हासमोर लाईट लागल्याचा आरोप मतदार राजू दुर्गे यांनी केला. संतापाच्या भरात त्यांनी सरळ मशीन फोडत विरोध दर्शविला, आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

🔥 मतदाराचा गंभीर आरोप : “मी ज्या उमेदवाराला मतदान करत होतो, तेच EVM स्वीकारत नव्हती!”

मतदान सुरू असताना राजू दुर्गे यांनी मतदान केंद्रात मोठा गोंधळ निर्माण केला. त्यांच्या म्हणण्यानुसार—

> “मी नगारा चिन्हावर बटन दाबलं… पण लाईट कमळासमोर लागलं! हा माझ्या मतदान अधिकारावर थेट हल्ला आहे!”

त्यानंतर त्यांनी संतापाच्या भरात EVM मशीन फोडली, ज्यामुळे मतदान काही काळासाठी बंद ठेवून नवीन मशीन नि निवडणूक चालू केली

🛑 निवडणूक परदार्शकतेवर प्रश्नचिन्ह

हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक, उमेदवार आणि पक्षप्रतिनिधींमध्ये संताप उसळला आहे. गडचांदूरमध्ये एकच चर्चा—

“EVM खरंच सुरक्षित आहे का? नागरिकांचा मतदानाचा संविधानिक हक्क धोक्यात आहे का?”

भारताच्या संविधानाच्या कलम 326 नुसार प्रत्येक नागरिकाला मुक्त, प्रामाणिक आणि निर्भय मतदानाचा अधिकार आहे. परंतु अशा प्रकारांनी मतदान प्रक्रियेवरील विश्वासाला मोठी तडा जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानीय नागरिकांचा संताप

मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली होती. अनेकांचे म्हणणे—

> “निवडणूक आयोग म्हणतो EVM छेडछाड होत नाही. पण मग लाईट का बदललं?”

मतदानावर विश्वास उरला तर कसा? हा सरळ संविधानिक अधिकाराचा भंग आहे!”

काही उमेदवारांनी संपूर्ण प्रभागातील मतदानाची पुनर्मोजणी किंवा पुनर्मतदान करण्याची मागणीही केली आहे.

🗳️ निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करावी — जनतेची मागणी

 

या घटनेमुळे संपूर्ण गडचांदूरमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर शंका निर्माण झाली आहे. नागरिकांनी आयोगाकडे मागणी केली—

EVM मध्ये बिघाड झाला की छेडछाड? सत्य बाहेर आले पाहिजे. मतदानावरचा विश्वास तुटू देऊ नका.”

 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments