Homeगडचिरोलीपुंडलिक भांडेकर ज्येष्ठ नाट्यलेखक पुरस्काराने सन्मानित.

पुंडलिक भांडेकर ज्येष्ठ नाट्यलेखक पुरस्काराने सन्मानित.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

Oplus_131072

प्रल्हाद रंगभूमी वडसा देसाईगंज येथे झाला सन्मान.

चामोर्शी :  झाडीपट्टी नाट्यविकास मंडळ वडसा देसाईगंज द्वारा आयोजित ५ वे झाडीपट्टी नाट्य संमेलन ४ व ५ ऑक्टोबर रोजी आदर्श महाविद्यालय वडसा देसाईगंज येथे पार पडले असून, चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै येथील नाट्यलेखक, कवी, गीतकार, पत्रकार पुंडलिक भांडेकर यांना जेष्ठ नाट्यलेखक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
झाडीपट्टी नाट्यविकास मंडळ वडसा देसाईगंज द्वारा आयोजित ५ वे झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे अर्थ, नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य डॉ के आत्माराम हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम होते. विशेष आकर्षण म्हणून चला हवा येऊ द्या फेम हास्यसम्राट भारत गणेशपुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ परशुराम खुणे, माजी आमदार कृष्णा गजबे, जेष्ठ रंगकर्मी डॉ शेखर डोंगरे, झाडीपट्टी नाट्यविकास मंडळाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक डॉ अनिरुद्ध वनकर, जेष्ठ रंगकर्मी डॉ नरेश गडेकर, जेष्ठ दिग्दर्शक शेखर पटले, रागिणी बिडकर, शबाना खान, ज्ञानेश्वरी कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसीय नाट्य संमेलनानिमित्त पहिल्या दिवशी कला दिंडी काढण्यात आली तसेच झाडीपट्टीतील अनेक हरहुन्नरी कलावंतांनी नाटक, कला, संगीत, गीत गायन, कीर्तन, नृत्य, लावणी अशा विविध कलेच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगभूमीच्या विविध विषयावर परिसंवाद करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुरस्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी जीवन गौरव पुरस्कार व ज्येष्ठ नाट्यलेखक, जेष्ठ रंगकर्मी, जेष्ठ निर्माता, जेष्ठ संगीतकार , उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक यासह अनेक कलावंतांना सन्मानित करण्यात आले. नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नसल्यामुळे त्यांना २० नोव्हेंबर रोजी प्रल्हाद रंगभूमी वडसा देसाईगंज येथे ज्येष्ठ निर्माते, नाट्यलेखक, दिग्दर्शक, कविवर्य प्रल्हाद मेश्राम, एकता रंगभूमीचे निर्माते ताजुल उके, कलांकुर रंगभूमीचे निर्माते गौतम सिंहगडे यांच्या हस्ते जेष्ठ लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला .
नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर यांनी २००० पासून नाट्यलेखनाची सुरुवात केली असून ते आजतागायत नाट्यलेखक आहेत. त्यांनी महाराष्ट्र ललित रंगभूमी निर्मित जवानी झिजली सुडासाठी, पाटलाच्या दारात लग्नाची वरात, दिवा माझ्या वंशाचा या नाटकाचे लेखन करून प्रयोग सादर केले आहे. नटराज रंगभूमी व झाडीपट्टी मराठी रंगभूमी निर्मित चक्रीवादळ, ऋषी शेबे निर्मित सात जन्म तुला वाहिले, अभिनव नाट्य संपदा निर्मित कुंकू पुसल सौभागिनीच, एकता रंगभूमी निर्मित जाऊ कशी मी सासरला, आक्रोश सुहासिनीचा, कलंकुर निर्मित प्रेम प्रतीक्षा, बदला यासह लग्नगाठ, अश्रू सुखदुखाचे, एक स्त्री पात्र उगवली पहाट जत्रेची, आदी नाटकाचे लेखन केले आहे. त्यांच्या हस्तलिखित नाटकात पद्मश्री डॉ परशुराम खुणे, डॉ शेखर डोंगरे, माणिक शिंदे, के आत्माराम, मधु जोशी, डॉ अनिरुद्ध वनकर, कमलाकर बोरकर, प्रभाकर आंबोने, शेखर पटले, सुनील अष्टेकर, डॉ नरेश गडेकर, अरविंद झाडे, किसन येरम, वासुकुमार, समीर दंडाळे, मुन्ना बीके, मुकेश गेडाम, के रवी, पी लालचंद, निकेश खोबरे, वत्सला पोलकमवार, शबाना खान, विजया देवळीकर, मंगला दंडाळे, पद्मा जयस्वाल, शुभलक्षी, कीर्ती आवळे, अनिता सातारकर, सीमा कुलकर्णी, करिष्मा भाग्यवंत, अशा अनेक कलावंतांनी भूमिका साकारली आहे. पुंडलिक भांडेकर हे सध्या पत्रकार, नाटक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना जेष्ठ नाट्यलेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे झाडीपट्टी कलावंत, पत्रकार व सामाजिक क्षेत्रात अभिनंदन केले जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments