HomeBreaking Newsअनुसुचीत जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, येथील मुख्याध्यापकांच्या मनमानीने...

अनुसुचीत जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, येथील मुख्याध्यापकांच्या मनमानीने शाळा हादरली; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, निलंबनाची जोरदार मागणी.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

गडचिरोली (नवेगाव) : अनुसुचीत जाती व नवबौद्ध

विद्यार्थ्यांच्या शासकीय निवासी शाळेत सुरु असलेल्या भोंगळ कारभाराबाबत ची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे जिल्हा महासचिव मंगलदास चापले देवानंद दुर्गे रोशन गेडाम यांनी शाळेला भेट दिली असता शाळेचा भोंगळ कारभार उघडकीस आला.

शाळेचे मुख्याध्यापक पालक सभा कधीच घेत नाहीत. पालकांसोबत असभ्य वर्तणुकीत बोलतात, खोटे बोलतात, पालक शाळेच्या ग्रुप वरती काही मेसेज केले असता मुख्याध्यापक ते डिलीट मारतात, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शाळेतील मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या अन्न, वसतिगृह आणि शैक्षणिक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मुख्याध्यापकांच्या त्वरित निलंबनाची मागणी केली आहे. तसेच

चक्क मुख्याध्यापकांनी शासनाचे कोणतेही शासन निर्णय प्राप्त न होताच सर्व नियम धाब्यावर धरुन शाळेचे नाव स्वतःच्या मर्जीने बदलविले. याविषयी माहिती घेतली असता मुख्याध्यापकांनी उडवा उडवी चे उत्तर देत होते.

या विषयी सखोल चौकशी करुन दोषी मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे व पदाधिकारी यांनी केली आहे.

शाळेचे जे नाव आहे तेच नाव ठेवण्यात यावे. नाव बदलवील्या गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या हक्कांशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून पालक व स्थानिक नागरिक याबाबत संताप व्यक्त करत आहेत.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments