Homeगडचिरोलीआरमोरीच्या विकासासाठी जयकुमार मेश्रामच योग्य — नागरिक, सुशिक्षित युवा वर्ग व समाजघटकांचा...

आरमोरीच्या विकासासाठी जयकुमार मेश्रामच योग्य — नागरिक, सुशिक्षित युवा वर्ग व समाजघटकांचा एकमताने ठराव.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

आरमोरी ,दि. 05/11/2025

आरमोरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या विविध समाजघटकांचे प्रतिनिधी, सुशिक्षित युवा वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्षपदासाठी  जयकुमार महादेव मेश्राम यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात आरमोरी तालुका काँग्रेस समितीकडे निवेदन सादर करण्यात आले असून,  जयकुमार मेश्राम यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कार्यामुळे तेच नगराध्यक्षपदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचे मत सर्वांनी एकमुखाने व्यक्त केले आहे.

स्थानिक युवक व समाजघटकांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आरमोरी शहरात पारदर्शक, विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक कारभाराची अपेक्षा व्यक्त केली आहे. श्री. जयकुमार मेश्राम यांनी दीर्घकाळ आरमोरीतील विविध समाजघटकांसाठी निःस्वार्थपणे काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

या निवेदनावर आरमोरीतील विविध समाजातील युवा, महिला व मान्यवर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, ही मागणी मोठ्या प्रमाणावर जनतेच्या पाठिंब्याने पुढे आली आहे.

निवेदन सादर करणारे:
आरमोरी तालुक्यातील सुशिक्षित युवा वर्ग आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments