सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी:-
अवकाळी पावसाने शेतातील धानपीक आणि कापूसपीकाचे नुकसान
: अलीकडील काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः धान व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, “अवकाळी पावसाने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे कर्ज वाढले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा.”


स्वाभीमानी सामाजिक संघटनेकडून तहसीलदार यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी म्हूणन निवेदन सादर चामोर्शी तालुका हा कृषिप्रधान असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी धान व कापूस पिकाची लागवड केलेली आहे सदर पिकांची काढणीची वेळ आली आहे आणि काही शेतकऱ्यांनी धान पिकांची कापणी सुरु केलेली आहे धान कापून शेतामध्ये सुकविण्याकरिता ठेवलेलेआहे त्याचप्रमाणे कापूससुद्धा पूर्ण काढण्याच्या स्थितीत आलेला आहे अस असताना दिनांक 27 ऑकटोबर पासून अवकाळी पाऊस सुरु आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे आणि होत आहे धान कापून सुकवत ठेवलेले शेतातील धान पीक भिजून त्याला अंकुर फुटले आणि उभे असलेले धान पीक पूर्णतः खाली पडले आहे नुकसान एवढी झाली आहे की शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे त्यांना अर्थसाहाय्य किंवा शासनाकडून मदत मिळाली नाही तर अनेक शेतकरी आत्महत्याच्या दारावर उभे ठाकलेली आहेत.
आपण तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार साहेब आपणास विनंती आहे की या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान, कापूस पिकाचा मौका पंचनामे करून झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई देण्याचे करावे ही विनंती या निवेदनातून स्वाभिमानी सामाजिक संघटनेद्वारे मनिकचंद कोहळे, श्रावणजी सोनटक्के, राजेश्वर धोंडरे, संतोष बुरांडे, प्रदीप भांडेकर, भरत धोंडरे यांनी केलेली आहे.







