Homeकृषीपंचनामे करून तत्काळ मदत द्या - युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे...

पंचनामे करून तत्काळ मदत द्या – युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांची मागणी. .

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्यूज.

चामोर्शी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. – विशेषतः हलके धान पीक आणि कापूस पीक – कापणी आणि वेचणीच्या वेळीच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष
राहुल वैरागडे यांनी केली आहे. चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात आणि कापूस या पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आलेल्या परतीच्या भागांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वरूर, सिमुलतला, गांधीनगर, श्यामनगर, भिवनबोडी, बेळगटा, धर्मपूर, सोमनपल्ली, कोणसरी, रायपूर, येणापूर, जयरामपूर, लक्ष्मणपूर, दुर्गापूर, विठ्ठलपूर, मुधोली, वायगाव, भेंडाळा केंद्रात, कुनघाडा आदी परिसरातील धान पिकाला फटका बसला आहे.तलाठ्यांनी अजूनही पावसामुळे अनेक पंचनामे करण्याच्या कामाला सुरूवात केली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यावे अशे निवेदनामार्फत मागणी केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments