सोनू वाळके, उपसंपादक,लोकवाद न्यूज.
चामोर्शी (जि. गडचिरोली) – जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा या विचाराने प्रेरित होत जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्यांचे निराकरण करण्यास मी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन चामोर्शी तालुक्यातील जनसेवक अतुल गण्यारपावर यांनी केले.
गण्यारपावर यांनी सांगितले की, शासन योजनांचा लाभ प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे हीच खरी लोकसेवा आहे. गावागावातील रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत विकासाची गती वाढविणे हे माझे प्रमुख ध्येय आहे.
स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “मी राजकारणात येण्यासाठी नाही, तर समाजकारणासाठी मैदानात उतरलो आहे. प्रत्येक गरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टीने काम करणाऱ्या अतुल गण्यारपावर यांच्या या भूमिकेचे स्थानिकांमधून कौतुक होत आहे. गावोगावच्या बैठकींमधून लोकांशी थेट संवाद साधून त्यांनी ‘जनतेची सेवा, हेच माझं ध्येय’ अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
मोतीबिंदू ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. मोतीबिंदूवर उपचार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेमध्ये, डोळ्यातील लेन्स (मोतीबिंदू) काढून टाकून, त्याची जागा कृत्रिम लेन्सने भरली जाते, ज्यामुळे दृष्टी सुधारते. शिबिराच्या माध्यमातून, मोतीबिंदू असलेल्या लोकांना वेळेवर उपचार मिळतील आणि त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होईल. या अंतर्गत गण्यारपवार फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. जनतेची सेवा करण्यास आपली प्रथम प्राथमिकता राहील असे प्रतिपादन संचालक अतुल गण्यारपवार यांनी केले.
अतुल गण्यारपवार, माऊली फाउंडेशन व युवा मित्र प्रतिष्ठानच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू, शस्त्रक्रियाफत मोतीबिंदू भिगाहो नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन भेंडाळा येथे ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सरपंचा कुंदा जुवारे, रुपाली दहेलकर, नरेंद्र जुवारे, सुरेश परसोडे, विजय बहरेवार, प्रमोद बोरलावार, किशोर बुरे, पंकज दहेलकर आदी उपस्थित होते.मार्गदर्शन करतांना अतुल गण्यारपवार पुढे म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. मार्केटिंग फेडरेशनकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याचे काम ग्रामीण भागातील जनतेला योग्य तो लाभमिळावा म्हणून गाण्यारपवार फाउंडेशन यांच्याकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्यांची सेवा करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे.







