Homeगडचिरोलीपदासाठी पक्ष बदलणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना बदला : SC-ST, माळी, मुस्लिम समीकरणातून तिसरा...

पदासाठी पक्ष बदलणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना बदला : SC-ST, माळी, मुस्लिम समीकरणातून तिसरा पर्याय उभा करा — आजाद समाज पार्टीचे(ASP) “विनोद मडावी” यांचे आवाहन.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद.

गडचिरोली :
गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण (महिला) आरक्षण जाहीर होताच राजकीय गणितात उलथापालथ सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतून नेत्यांची अदलाबदल सुरू असून, पुन्हा एकदा आपल्या समाजाच्या प्रतिनिधित्वावर अन्याय होण्याची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर  आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवित, SC-ST, मुस्लिम, माळी आणि ढिवर समाजाने एकत्र येऊन तिसरा पर्याय उभा करण्याचे आवाहन केले आहे.

मडावी म्हणाले,

> “काँग्रेस पक्ष सतत बिरसा, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची गप्पा मारतो, पण प्रत्यक्षात अनारक्षित जागा कधीही SC-ST किंवा इतर वंचित समाजाला देत नाही. भाजपही याच वाटेवर चालत आहे. त्यामुळे आज या समाजाने एकत्र येऊन या दोन पक्षांच्या स्वार्थी राजकारणाला पर्याय उभा करणे अत्यावश्यक आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की,
काँग्रेसकडे अनुसूचित जाती व जमातीतील नेत्यांची मोठी फळी असतानाही त्यांना वारंवार डावलले जाते. माजी सभापती *माधुरी मडावी* या अनुसूचित जमातीतून असूनही तसेच काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ऍड. *कविता माहोरकर* या अनुसूचित जातीच्या असूनही, त्यांना संधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा आरोप विनोद मडावी यांनी केला व आजाद समाज पार्टी याला पर्यायी राजनीती उभी करेल असेही म्हणाले.

> “राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सतत दुर्लक्षित ठेवलेल्या SC-ST, मुस्लिम, माळी, ढिवर समाजाने जर एकत्र येऊन शक्ती दाखवली, तर गडचिरोलीत तिसरा मजबूत पर्याय उभा राहू शकतो,”

असे मडावी यांनी ठामपणे म्हटले.

गडचिरोली शहरात अंदाजे SC मतदार सुमारे 10 ते 11 हजार, ST सुमारे 7 हजार, तसेच मुस्लिम, माळी, ढिवर समाज मोठ्या प्रमाणावर असल्याचे विनोद मडावी यांनी नमूद केले. हे समाज एकत्र आल्यास काँग्रेस आणि भाजप दोघांनाही मोठे आव्हान निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजाद समाज पार्टी  या तिसऱ्या पर्यायाच्या निर्मितीसाठी समाजातील प्रबुद्ध, संघर्षशील, परिवर्तनवादी घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments