HomeBreaking Newsगडचिरोलीच्या राजकारणात भूचाल! भव्य पक्षप्रवेशाने बदलली संपूर्ण समीकरणं"

गडचिरोलीच्या राजकारणात भूचाल! भव्य पक्षप्रवेशाने बदलली संपूर्ण समीकरणं”

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद.

“गडचिरोलीत रंगले राजकारण — एका पक्षप्रवेशाने बदलली दिशा”

गडचिरोली :- आज गडचिरोली येथे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थित गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तथा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव संदेश सिंगलकर, प्रदेश सचिव शकूर नागाणी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव संतोषसिंह रावत, प्रदेश सचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे, समसेरखान पठाण सह इतर पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष सेल अध्यक्ष व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) गडचिरोली नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, कविताताई पोरेड्डीवार, माजी न. प. सभापती विजय गोरडवार, माजी जि. प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, माजी जिल्हा परिषद सदस्य लालसुजी पुंगाटी, शिवसेनेचे गजानन नैताम सह अनेक माजी नगरसेवक त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश सोहळा ठरला असून यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बळकटी असल्याचा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments