Homeआरोग्यचामोर्शी ग्रामीण रुग्णालयात डेंगू रुग्णांची संख्या वाढली, खाटा अपुऱ्या – गादीवर सुरू...

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात डेंगू रुग्णांची संख्या वाढली, खाटा अपुऱ्या – गादीवर सुरू उपचार

सोनू वाळके,उपसंपादक.

चामोर्शी (जि. गडचिरोली)

गडचिरोली जिल्ह्यात डेंगूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात परिस्थिती गंभीर बनली आहे. रुग्णसंख्या एवढी वाढली आहे की रुग्णालयातील खाटा पूर्ण भरल्या असून नव्या रुग्णांना मजल्यावर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत.

दररोज ग्रामीण भागातून अनेक डेंगूग्रस्त रुग्ण उपचारासाठी चामोर्शी रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र रुग्णालयातील खाटांची संख्या मर्यादित असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. काही ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वतःच्या गादी घेऊन बसावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त करत तातडीने अतिरिक्त खाटा, डॉक्टर व आवश्यक औषधसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

डेंगूच्या वाढत्या प्रकरणांमुळे फवारणी, स्वच्छता मोहीम आणि पाण्याच्या साठवणीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.

 

 

 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments