सोनू वाळके,उपसंपादक.
गणेशपिपरीत शेतशिवारात एका महिलेचा घेतला वाघाने बळी – गणेशपिपरीत तणावाची स्तिथी.
चंद्रपूर:-(गोंडपीपरी)
शेतात काम करायला गेलेल्या महिलेचा वाघाने बळी घेतला. सात दिवसात दोन शेतक-यांचे जिव गेल्यानंतरही वनविभागाकडून वाघाचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. पण प्रशासनाकडून सदर मृतदेह हटविण्यात आला. यामुळे आज सकाळपासूनच धाबा टर्नीगवरील अहेरी नागपूर हा मुख्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन तासाहून अधिक काळापासून हा जाम सुरू असून वाहतूक व्यवस्था पुरती विस्कळीत झाली आहे. आंदोलनादरम्यान नागरिकांनी गोंडपिपरी येथील दुकान बंद केलीत. तातडीने न्याय मिळाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा परिसरातील शातकरी बांधवानी नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने खबरदारी उपाय म्हणून यंत्रणा सज्ज ठेवली गोंडपिपरी येथे आज सकाळपासूनअतिशय आक्रमक आंदोलनाला सुरवात झाली. यात परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.गणेशपिपरी येथील अल्का पेंदोर या आपल्या शेतात काम करित असतांना वाघाने त्यांचा बळी घेतला. सायंकाळी हि बाब लक्षात येताच गावकरी एकत्र आले. आठ दिवसात दोन शेतकरी बांधवांचे बळी घेणा-या वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. यामुळे काल रात्री उशिरापर्यत गणेशपिपरीत तणावाची स्थिती होती. वनविभागाची चमु घटनास्थळी दाखल झाली. सत्ताधारी, अनेक नेते घटनास्थळी पोहचले. पण नागरिकांनी या सर्व यंत्रणेविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. धक्काबुक्कीही झाली. नागरिकांनी अनेकांना सुनावले देखील. मागणी मान्य होईपर्यत मृतदेह उचलू देणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली. पण प्रशासनाकडून मृतदेह उचलण्यात आल्याने नागरिकांनी आज सकाळपासून अतिशय आक्रमक धोरणाचा अवलंब केला. अहेरी-नागपूर हा महामार्ग तब्बल दोन तासाहून अधिक काळापर्यत रोकून धरला. अजुनही जाम सुरूच आहे. दरम्यान या आंदोलनामुळे प्रमुख मार्गाची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. दरम्यान संतापलेल्या आंदोलकांनी गोंडपिपरी येथील बाजारपेठ बंद केली. अजुनही आंदोलन सुरूच आहे.







