Homeचंद्रपूरवेकोली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम. मूनघंटीवार यांनी नागपूर येथे WCL चे अध्यक्ष जे....

वेकोली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम. मूनघंटीवार यांनी नागपूर येथे WCL चे अध्यक्ष जे. पी. द्विवेदी यांची भेट घेऊन केली चर्चा.

सोनू वाळके,उप संपादक, लोकवाद.

चंद्रपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे अध्यक्ष तथा प्रबंधक संचालक जे. पी. द्विवेदी यांची आम. मूनघंटीवार यांनी अलीकडेच नागपूर कार्यालयात भेट घेतली. या भेटीत वेकोली क्षेत्रातील शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न,  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न,रोजगार, जमीन अधिग्रहणानंतरचे नुकसान भरपाई, रोजगार संधी तसेच पर्यावरणीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आम.मूनघंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे द्विवेदी यांना सांगितले . तसेच वेकोलीच्या प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या चर्चेत WCL अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments