Homeगडचिरोलीगॉस्पेल इंडिया मिनिस्ट्रीज् द्वारा 'संविधान जागरण कार्यक्रम'

गॉस्पेल इंडिया मिनिस्ट्रीज् द्वारा ‘संविधान जागरण कार्यक्रम’

गॉस्पेल इंडिया मिनिस्ट्रीज् द्वारा ‘संविधान जागरण कार्यक्रम’

प्रतिनिधी गडचिरोली,

प्रजासत्ताक दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील गोगावं येथे गॉस्पेल इंडिया मिनिस्ट्रीज् द्वारा ‘संविधान जागरण कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात घेण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.वनिशाम येरमे (नायब तहसीलदार, गडचिरोली), मुख्य वक्ता – अँड.श्री.अश्विन पॉलीकर (चंद्रपूर), संस्थेचे सचिव श्री.अमोल परागे सर (चंद्रपूर) हे होते. ह्या कार्यक्रमास श्री. राजूभाऊ उंदीरवाडे (सरपंच, गोगाव), श्री.निलेश दाकोटे (उपसरपंच, गोगाव ), श्री.उत्तम मुंघाटे (पोलिस पाटील, गोगाव ), श्री.देवेंद्र शेंडे (तंटा मुक्ती अध्यक्ष. गोगाव) तसेच सौ. समिता दुपारे, श्री. प्रवीण दुपारे, श्री. प्रवीण उंदीरवाडे, सौं. संगीता उंदीरवाडे, श्री. लालाजी शेंडे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. राकेश कोडापे ह्यांनी केले.

 

  1. मार्गदर्शनाची सुरुवात गावचे सरपंच श्री.राजूभाऊ उंदीरवाडे ह्यांनी आपल्या तडफदार शैलीतून केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.वनिशाम येरमे (नायब तहसीलदार), ह्यांनी संविधान विषयीची पार्श्वभूमी सांगितली तसेच कुणाचे किती योगदान संविधान रचण्या मध्ये होते त्या विषयी मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाचे मुख्य वक्ता, अँड. श्री.अश्विन पॉलीकर, ह्यांनी सविस्तर रीतीने संविधान विषयी मार्गदर्शन केले व संविधानाची प्रत प्रत्येकांच्या घरी असावी व कोणाच्या अधिकाराचे हननं होणार नाही यासाठी प्रत्येकाने कार्यरत व्हावे ह्याबद्दल उपस्थितांना प्रोत्साहित करत संविधान अधिकाराविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची समाप्ती ही सन्मानपूर्वक राष्ट्रगान गाण्याद्वारे करण्यात आली.
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments