HomeBreaking Newsतेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू

रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ;

नागरिकांनी दक्षता घ्यावी- गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने  तथा  चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा 

गडचिरोली /चंद्रपूर दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली तथा चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.

या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.

अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत  सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली संजय दैने व जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

मुल शहरातही जाणवले धक्के

शहरातील काही वॉर्डातील सोम्य झटके जाणवेल आहे. काही वेळ तर नागरिकांना नवलच वाटले मात्र सादर बाबीची पुष्टी होताच अनेक वॉर्डातील नागरिकांना घडलेला प्रकार सांगण्यात सुरुवात केली आहे. खुद लोकवाद चे  मुख्य संपादक दुर्योधन घोंगडे  तथा कावळे या दांपत्याने  मांदाडे यांच्या मालकीच्या दुमजली इमारतीवर किरायाने वास्तव्यास  आहेत सकाळचे सुमारास कावळे या दांपत्याने  आपले टीव्ही ,फ्रिज, पलंग, आदी काही वेळ हल्ल्याचे सांगितले सुरुवातीला सदर बाबीला नवलच वाटले मात्र वृत प्रकाशित होताच सदर बाबा सत्य असल्याची निदर्शनात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी असे आवाहन संबंधित अधिकारी वर्गाकडून केल्या जात  आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments