Homeगडचिरोलीधीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; इंदिरा गांधी चौकात काँग्रेसची निदर्शने.

धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; इंदिरा गांधी चौकात काँग्रेसची निदर्शने.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी काँग्रेसची मागणी.

 

गडचिरोली : धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अत्यंत चुकीचे व अवमानकारक वक्तव्य केले आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावणारी आहे.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी कोणताही विरोध न करता मौन बाळगले, ही बाब अधिक गंभीर असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा तसेच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदिरा गांधी चौक येथे निदर्शने व तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाद्वारे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व अशा प्रकारचे वादग्रस्त आणि भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आदिवासी काँग्रेस राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, शहराध्यक्ष नगरसेवक सतीश विधाते, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद कोब्रागडे, वळसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, राजेश ठाकूर, प्रभाकर वासेकर, अब्दुल पंजवानी, देवाजी सोनटक्के, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, नगरसेवक नंदू कायरकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक मेघाताई वरगंटीवार, माधवराव गावड, हरबाजी मोरे, वामनराव सावसाकडे, रुपेश टिकले, संजय चन्ने, स्वप्निल बेहेरे, उत्तम ठाकरे, विजय लाड, सुदर्शन उंदीरवाडे, नदीम नाथानी, चोखाजी बांबोडे, मुरलीधर मेश्राम, नितीन लाडे, सितारामजी टेंभुर्ने, संदीप भैसरे, ढीवरु मेश्राम, जितेंद्र मुनघाटे, मुनीत पठाण, मोहन वरगंटीवार, हेमंत मोहितकर, सोनू आलाम, कल्पना नंदेश्वर, शालिनी पेंदाम, रीता गोवर्धन, मीनल चिमूरकर, शितल ठवरे यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments