HomeBreaking Newsमूलमध्ये वाढत्या घटनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? नागरिकांमध्ये संताप; “नागरीदक्षता समिती”ची मागणी जोरात

मूलमध्ये वाढत्या घटनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? नागरिकांमध्ये संताप; “नागरीदक्षता समिती”ची मागणी जोरात

🔴 मूलमध्ये वाढत्या घटनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? नागरिकांमध्ये संताप; “नागरीदक्षता समिती”ची मागणी जोरात

📍 मूल (प्रतिनिधी) लोकवाद; 
मूल शहरात मागील काही महिन्यांपासून वाढत असलेल्या विविध घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गांजा व इतर नशिले पदार्थांचे सेवन करून तरुणांकडून धुडगूस, मारहाण, भांडणे यांसारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच अलीकडील हनी ट्रम्प VDO प्रकरण, ipl सटा, गॅस सिलेंडर तुटवडा आणि नव्याने सुरू झालेले मालधक्का प्रकरण, मुल बुकिंग प्रकरण,तसेच आदी अनेक कारणामुळे निर्माण झालेल्या व होणाऱ्या समस्याने शहरातील परिस्थिती अधिकच बिघडलेली दिसून येते.
या सर्व घडामोडींमुळे मूल शहराची प्रतिमा मलिन होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नांवर तालुका प्रशासन अपेक्षित ती दखल घेत नसल्याचेही समोर येत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप वाढत आहे.
दरम्यान, शहरातील काही सजग नागरिकांनी यावर उपाय म्हणून सर्वपक्षीय, सर्वसमावेशक “मूल नागरीदक्षता समिती” स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. या समितीत विविध क्षेत्रातील जेष्ठ व अनुभवी व्यक्तींना सहभागी करून कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता शहरातील समस्यांवर चर्चा करून निर्णय घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
👉 या माध्यमातून प्रशासनावरही सकारात्मक दबाव निर्माण होऊन प्रश्न सोडवण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या तरी या प्रस्तावाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर किती गांभीर्याने पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments