Homeगडचिरोलीखाजगी शाळांची फी मनमानी आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; NSUI कडून प्रशासनाला कारवाईची...

खाजगी शाळांची फी मनमानी आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; NSUI कडून प्रशासनाला कारवाईची मागणी

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली:- जिल्ह्यात खाजगी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून विद्यार्थ्याकडून आकारली जाणारी अवाजवी फी आणि शाळेच्या वाहनांमधील असुरक्षित वाहतूक हा गंभीर प्रश्न बनला आहे. या संदर्भात NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी
प्रशासनाचे लक्ष वेध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल वैरागडे यांनी सांगितले की जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळा विद्यार्थ्याकडून मनमानी पद्धतीने मोठ्या प्रमाणात फी आकारत आहे. नियमित फी व्यतिरिक्त विविध नावाखाली हिडन चार्जेस व अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याने पालकावर मोठा आर्थिक भार पडत आहे.
बहुतांश खाजगी शाळेत शाळेत अहर्ता धारक शिक्षक नाही.
पालक वर्गांची दिशाभूल करून सरास आर्थिक लूट केली जात आहे.
शहरी भागासह आता ग्रामीण खेड्यापाड्यातील पालकांना मुलाच्या भविष्याचा विचार करून “कॉन्व्हेंट” च्या भुलथापाना बळी पडून आर्थिक कोंडी करून सुद्धा मुलाची गुणवत्तेत कोणतीच भर पडत नाही याचं एकमेव कारण म्हणजे “अप्रशिक्षित शिक्षक” ज्यांचा स्वतःचं शैक्षणिक दर्जेहीन असल्यामुळे ते बालकांवर काय संस्कार करणार.
पालक फक्त प्रतिष्टेपोटी मुलांना कॉन्व्हेंट मध्ये दाखल करतात, आणी याचा थेट फायदा काही शैक्षणिक संस्थाचालक घेत असतात.

तसेच जिल्ह्यात घरबसल्या शिक्षण होम स्टडी या प्रकरण या प्रकारातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे काही विद्यार्थी वर्षभर शाळेत नेहमीच उपस्थित राहत नाही आणि फक्त परीक्षा किंवा प्रॅक्टिकल च्या वेळेस शाळेत हजर होतात अशा प्रकारच्या पद्धतीमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे राहुल वैरागडे यांनी सांगितले.
यासोबतच शाळेच्या वाहतूक व्यवस्थेबाबत एक गंभीर समीक्षा सामोर येत आहे अनेक शाळांच्या व्हेन, ऑटो व बसमध्ये समतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांना बसून नेले जात आहे.8 ते 10
विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या वाहनांमध्ये 20 – 25 विद्यार्थ्यांना कोंडून नेले जाते तर 40 50 विद्यार्थ्यांच्या बस मध्ये 70 80
विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते यामुळे जिल्ह्याच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर राहुल वैरागडे यांनी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाने खाजगी शाळांची फी रचना व वाहतूक व्यवस्थेची सकल चौकशी करून कठोर नियमाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments