Homeगडचिरोलीशासकीय वाळू डेपो वाघोली येथे ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांच्या शुभहस्ते शरबत स्टॉलचे उदघाटन*

शासकीय वाळू डेपो वाघोली येथे ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांच्या शुभहस्ते शरबत स्टॉलचे उदघाटन*

शासकीय वाळू डेपो वाघोली येथे ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांच्या शुभहस्ते शरबत स्टॉलचे उदघाटन*

*उमेद व ग्रामसंघाची मिळाली साथ आर्थिक दुर्बल महिलेनी धरली उद्योगाची कास*

चामोर्शी, प्रतिनिधी :-आज एकता ग्रामसंघ वाघोली अंतर्गत श्रीमती पौर्णिमा चंद्रशेखर दुर्गे , रा. वाघोली ता. चामोर्शी या महिला भगिनीस वाघोली वाळू डेपो च्या आवारात सरबत स्टॉलचे उदघाटन सोहळा उमेद चे रवीद्र चुनारकर कृषी व्यवस्थापक तथा एकता ग्रामसंघ अध्यक्षा नलिशा बारसागडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या शरबत स्टॉल उभारण्यासाठी या होतकरू गरीब महिलेस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान “उमेद”च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली.

यामध्ये लिंबू सरबत, आवळा सरबत, अंबाडी सरबत, कैरीचे पन्हे, ताक इत्यादी सरबताचे/ पेयाचे प्रकार उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले आहे. आज एकता ग्रामसंघ वाघोली च्या वतीने आर्थिक साहाय्य देत विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दुर्गे ज्यूस सेंटर स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

बहुतांश यापूर्वी गोरगरीब आर्थिक विवंचनेत असणाऱ्या महिलेला उपजीविकेसाठी वाटेल ती मेहनत, त्याचप्रमाणे हंगामी रोजगारा करिता या भगिनींना मिरची तोडणीसाठी आंध्र प्रदेशात स्थलांतर करावे लागत होते; मात्र या उपक्रमामुळे त्यांना आता आपल्या गावातच सन्मानाने रोजगार उपलब्ध झाला आहे.

अशा उपक्रमातून गोरगरीब महिलांना आपल्या हक्काचं रोजगार मिळाला असून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संदेश देण्यात आला असून, त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा गोरगरीब भगिनींना साथ दिल्यास त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या प्रवासाला अधिक बळ मिळेल. अशी भावना यावेळेस उपस्थितांनी व्यक्त केली.

याप्रसंगी एकता Alhamdulillah अध्यक्षा नलिशा नितेश बारसागडे, उपाध्यक्ष अल्का प्रभाकर गायकवाड, रवींद्र चुनारकर कृषी व्यवस्थापक उमेद, शिल्पा खोब्रागडे ग्रामसखी वाघोली, मीनाक्षी कांबळे ग्रामसखी, धम्मदिना खोब्रागडे ग्रामसखी, दर्शना जुवारे ग्रामसखी वाघोली, भेंडाळा चे मोरेश्वर साखरे महसूल सहाय्यक, तथा संघटना अध्यक्ष चामोर्शी तसेच ग्रामवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments