लोकवाद न्यूज विशेष
चिचपली व सावली गॅस एजन्सीत गोंधळ; ऑनलाईन बुकिंग करूनही सिलेंडर नाही
चौकशी करून कार्यवाही करावी नागरिकांची मागणी
📍 मूल, प्रतिनिधी :
मूल तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात गॅस टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, चिचपली व सावली गॅस एजन्सीच्या वितरण व्यवस्थेत मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग करूनही दिवसेंदिवस प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
याउलट, काही नागरिकांना ऑनलाईन बुकिंग न करता किंवा नंबर न लावता सिलेंडर मिळत असल्याचे आरोप होत आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “आम्ही नियमाप्रमाणे ऑनलाईन बुकिंग करतो, तरीही सिलेंडर मिळत नाही. मात्र काहींना थेट एजन्सीकडून सिलेंडर दिले जातात. मग सामान्य माणसाने काय करायचे?”
या संपूर्ण प्रकारामुळे गॅस वितरणातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
❗ जनतेचा सवाल :
“नियम पाळणाऱ्यांनाच त्रास, आणि नियम मोडणाऱ्यांना फायदा – हीच का व्यवस्था?”
लोकवाद न्यूज संपर्क;- 9881197843
📸 मुख्य संपादक दुर्योधन घोंगडे,







