Homeगडचिरोलीवैद्यकीय महाविद्यालय पदभरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या, अन्यथा आंदोलन – राज बन्सोड(ASP)...

वैद्यकीय महाविद्यालय पदभरतीत स्थानिक तरुणांना प्राधान्य द्या, अन्यथा आंदोलन – राज बन्सोड(ASP) यांचा इशारा

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली : जिल्ह्यात वाढती बेरोजगारी, संधींचा अभाव आणि रोजगाराच्या मर्यादित सुविधा यामुळे स्थानिक सुशिक्षित तरुण मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, *गडचिरोली येथे सुरू होणार असलेल्या पदभरती प्रक्रियेत जिल्ह्यातील पात्र व सुशिक्षित युवक-युवतींना प्राधान्य द्यावे,* अशी ठाम मागणी आजाद समाज पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.

वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या आधीपत्याखाली गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग 3 व 4 ची रिक्त नियमित पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्रोताद्वारा भरण्याची आदेश नुकतेच शासनाने काढलेले आहे. त्यानुसार लवकरच कार्यवाहीला सुरुवात करणार असल्याचे गडचिरोली येथील डीन यांनी सांगितले. या संदर्भात अधिष्ठाता (डीन), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली यांचेशी चर्चा करून आजाद समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. गडचिरोली हा मागास व दुर्गम जिल्हा असून येथील युवकांनी *प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण* पूर्ण करून पात्रता मिळवलेली आहे. मात्र, बाहेरील उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर संधी दिल्यास स्थानिक तरुणांवर अन्याय होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

राज बन्सोड यांनी निवेदनात नमूद केले आहे की, स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्यास त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे सेवा पुरवठादारामार्फत (आउटसोर्सिंग) होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, नियमबद्ध आणि गुणवत्तेच्या निकषांवर आधारित राबविण्यात यावी. निवड प्रक्रिया व अंतिम यादी सार्वजनिक करून पारदर्शकता राखावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

“जिल्ह्यात बेरोजगार युवकांचे प्रमाण प्रचंड आहे. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये . स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास आजाद समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही राज बन्सोड यांनी दिला आहे. निवेदन देताना पक्षाचे प्रदेशसचिव धर्मानंद मेश्राम, प्रवक्ते प्रितेश अंबादे, धनराज दामले, प्रो. नरेश मोहुर्ले, निखिल निकोडे, सुरेंद्र वासनिक, नितीन दुर्गमवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments