HomeगडचिरोलीMSRDC अंतर्गत निकृष्ट दर्जाचे संडास-बाथरूम इमारत बांधकाम! कंत्राटदाराची मुजोरी —गुणवत्ता तपासणीसाठी उच्चस्तरीय...

MSRDC अंतर्गत निकृष्ट दर्जाचे संडास-बाथरूम इमारत बांधकाम! कंत्राटदाराची मुजोरी —गुणवत्ता तपासणीसाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

मार्कंडा देव येथे MSRDC अंतर्गत कंत्राटदार ची मुजोरी; JCB ने रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदकाम, येण्या जाण्यास अडथळा ,नागरिक त्रस्त

मार्कंडा देव परिसरात MSRDC अंतर्गत सुरू असलेल्या नाली बांधकामात कंत्राटदाराकडून JCB ने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अति-खोदकाम करण्यात आले आहे. जाणूनबुजून रस्ता उखडल्यामुळे नागरिकांचे हाल वाढले असून वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झालेली दिसते. कंत्राटदाराचे मनमानी कामकाज आणि प्रशासनाचा होत असलेला दुर्लक्षपणा स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण करत आहे.

मार्कंडा देव परिसरात MSRDC अंतर्गत सुरू असलेल्या संडास व बाथरूम बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्थानिकांनी म्हटले असून, साहित्याची गुणवत्ता, बांधकामाचा पाया आणि कार्यपद्धती या सर्वच बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात बेफिकिरी व अनियमितता दिसून येत आहे.

कंत्राटदाराकडून मुजोरी आणि मनमानीपद्धतीने काम सुरू असल्याचेही आरोप आहेत. कामात कोणतीही पारदर्शकता न ठेवता गुप्तपणे, तपासणी टाळून आणि नियम धाब्यावर बसवून काम केले जात असल्याने या कामामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा संशय बळावतो आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की MSRDC अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात संरचना वापरणाऱ्यांच्या सुरक्षिततेवर थेट धोका निर्माण होऊ शकतो.

येत्या काही दिवसांत अशी निकृष्ट कामे सुरू राहिली तर हा संपूर्ण प्रकल्प भ्रष्टाचाराचे आणखी एक उदाहरण ठरेल, अशी चर्चा सर्वत्र आहे.

MSRDC चा आर्थिक दुरुपयोग? काही महिन्यांपूर्वी केलेल्या डांबरीकरणावर पुन्हा सीसी रोड! शासनाचा पैसा धुळीत

मार्कंडा देव परिसरात MSRDC अंतर्गत काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण झालेले रस्ते आता पुन्हा उकरून त्याच ठिकाणी सिमेंट काँक्रिट (CC) रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या डांबरीकरणावर पुन्हा निधी खर्च करून केलेले हे काम म्हणजे शासनाचा पैसा उघडपणे वाया घालवणे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अधिकाऱ्यांची बेफिकिरी, नियोजनाचा अभाव आणि कंत्राटदारांचे मनमानी कारभार यामुळे सरकारी कोट्यवधी रुपयांचा निधी धुळीत जात असून, MSRDCच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

👉 या संशयास्पद कामावर तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे

👉 मार्कंडा देव येथील या संशयास्पद व निकृष्ट बांधकामावर तत्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी, जबाबदारांवर कारवाई करावी आणि कामाची गुणवत्ता टिकून राहावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments