सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, आलापल्ली येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. पि. डी. मेश्राम सर होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मुल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची थोडक्यात माहिती दिली तसेच संविधान प्रास्ताविकाचे वाचन आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
ह्या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या मार्गदर्शनासाठी श्री. तावडे सर व श्री. धाबेकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक श्री. भोयर सर होते, तर आभार कु. सरोज हेमके यांनी मानले.
शाळेतील 11 वी व 12 वी वर्गाचे विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उत्साहात कार्यक्रमात सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.