Homeगडचिरोलीधरती आबा बिरसा मुंडा यांचे स्मरणः महाराष्ट्र विद्यालय वैरागड येथे रॅलीने उजळली...

धरती आबा बिरसा मुंडा यांचे स्मरणः महाराष्ट्र विद्यालय वैरागड येथे रॅलीने उजळली आदिवासी अस्मितेची ज्योत

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

                         प्रेस नोट

 

आरमोरी, ता. १५ नोव्हेंबर २०२५: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील महाराष्ट्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात धरती आबा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम ‘जनजाती गौरव पंधरवडा‘ या उपक्रमांतर्गत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला असून, बँड स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि संघर्षाची जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण म्हणून विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याजवळ रॅली काढली. या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांना भावपूर्ण अभिवादन करून त्यांच्या आदिवासी उभारणीच्या कार्याला मानवंदना अर्पण केली. ही रॅली महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे बिरसा मुंडा यांच्या ‘अबुआ राज एते जान’ या घोषवाक्याचा जयघोष करत आदिवासी हक्कांसाठीच्या लढ्याला प्रेरणा मिळवली.
या कार्यक्रमात प्राचार्य उंदिरवाडे सर यांनी विद्यार्थ्यांना मुख्य मार्गदर्शन केले. तसेच, संस्था सदस्य प्रवीणजी कऱ्हाडे सर, नंदूजी कऱ्हाडे, प्रशांतजी कऱ्हाडे सर, प्रा. पटले सर, प्रा. चटकी सर, प्रा. कुंभारे सर, प्रा. वैरागडे मॅडम, मोटघरे मॅडम, वलके सर, मारभते सर, ढोबे सर, नहामूर्ते सर, काटवे मॅडम, प्रधान सर, पगाडे मॅडम, बारस्कर मॅडम, घुबडे सर अशा अनेक मान्यवरांचा उपस्थिती लाभ झाला. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बिरसा मुंडा यांच्या जीवन आणि कार्याबद्दल मार्गदर्शन करत आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments