सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली | दि. 12 नोव्हेंबर :
सायबर गुन्ह्यांविरोधात प्रभावीपणे कारवाई करत गडचिरोली सायबर पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ₹13,97,399/- किंमतीचे 90 हरवलेले मोबाईल फोन शोधून काढत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.









