Homeगडचिरोलीसामाजिक क्षेत्रात कार्यरत पांडुरंग सातार यांची केंद्रीय मानवाधिकार संगठनच्या तालुका अध्यक्षपदी निवड

सामाजिक क्षेत्रात कार्यरत पांडुरंग सातार यांची केंद्रीय मानवाधिकार संगठनच्या तालुका अध्यक्षपदी निवड

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी(दि 28/डिसेंबर 2025)

चामोर्शी परिसरात सातत्याने सामाजिक कार्य करणारे श्री पांडुरंग केशव सातार यांचे निवेदन श्रीकांत कोपुलवार यांनी केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मिलिंद दहिवले यांच्याकडे सादर केले.
निवेदनाची दखल घेत डॉ. दहिवले यांनी चामोर्शी परिसरात सातार यांची प्रत्यक्ष पाहणी (सहानिशा) केली. त्यांच्या कामाची पद्धत, सामाजिक भान आणि जनसंपर्क पाहून त्यांनी सातार यांना केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्ली — चामोर्शी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला.
या नियुक्तीद्वारे संघटनेच्या कार्याला तालुका स्तरावर अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नियुक्तीनंतर डॉ. मिलिंद दहिवले यांनी पांडुरंग सातार यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मानवाधिकार संवर्धनासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही सातार यांच्या निवडीचे स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वातून तालुक्यात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments