HomeBreaking Newsनिवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या “पैशाचा विचार करू नका, आपण...

निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या “पैशाचा विचार करू नका, आपण हिशोब देऊ” वक्तव्यावरून निवडणूक आयोगाकडे तक्रार

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी/गडचिरोली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “पैशाचा विचार करू नका, आपण हिशोब देऊ” असे त्यांनी अलीकडील प्रचार सभेत सांगितल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. प्रचार सभेदरम्यान कथितपणे “पैशाचा विचार करू नका… आपण हिशोब देऊ” असे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांनी आता थेट निवडणूक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत “निवडणूक आयोग घरघडी आहे का?” असा जाहीर सवाल उचलला आहे.

विरोधकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे वक्तव्य खुलेआम होणे आणि त्यावर आयोगाकडून तातडीची कारवाई न होणे, हा चिंतेचा विषय आहे.

त्यांनी आरोप केला की, अधिकार आणि जबाबदारी असतानाही निवडणूक आयोग “राजकीय दबावाखाली निष्क्रिय झाल्यासारखा” वागत आहे.

तक्रारदारांनी आरोप केला आहे की हे वक्तव्य थेट मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा संकेत असून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. निवडणूक पारदर्शकतेला धक्का देणारे हे विधान असल्याचा ठपका ठेवत संबंधित व्हिडिओ क्लिपसह आयोगाला पुरावे सादर करण्यात आल्याचे समजते.

विरोधकांनी अशी मागणी केली आहे की आयोगाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून बावनकुळे यांच्यावर कठोर कारवाई करावी.

दरम्यान, भाजपकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

या तक्रारीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments